जगप्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टुब्रोचे (Larsen & Toubro (L&T) चेअरमन एसएन सुब्रमण्यम (SN Subrahmanyan) यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यात 90 तास काम केले पाहीजे असे मत मांडले आहे, ज्यावरुन नवा वाद सुरु झाला आहे. एसएन सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यावरुन उलटसुलट चर्चा होत आहेत. यावरुनच आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दिपीका पदुकोणने संताप व्यक्त केला आहे.
'लार्सन अँड टुब्रो' (एल अँड टी) या मोठ्या कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांनी अलीकडेच आठवड्यातून कार्यालयात ९० तास काम असले पाहिजे असे अजब विधान केले. कर्मचाऱ्यांनी रविवारी काम करावे असाही त्यांनी सल्ला दिला. यावरुन नवा वाद सुरु असतानाच आता अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दीपिका पदुकोणने पत्रकार फेय डिसूझाचा फोटो शेअर करताना एसएन सुब्रह्मण्यम यांच्या विधानावर आक्षेप व्यक्त केला आणि हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. “एवढ्या वरिष्ठ पदांवर असलेल्या लोकांकडून अशी विधाने धक्कादायक आहेत. मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे, असेही तिने अधोरेखित केले आहे. दीपिका पदुकोणची ही प्रतिक्रिया सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
काय आहे प्रकरण?
उद्योजक एसएन सुब्रमण्यम यांनी आठवड्या तून ९० तास काम करण्याचा सल्ला दिल्याने एका नवीन वादाला तोंड फुटले. " घरात बसून तुम्ही तुमच्या पत्नीला किती वेळ पाहू शकता?" असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना कामाला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित केले. घरी बसून काय करणार आहात ? किती वेळ तु्म्ही बायकोला बघत बसाल आणि बायको तुम्हाला बघत बसेल ?" असं ते म्हणाले होते.
नक्की वाचा : जीडीपी घसरण्याचा केंद्र सरकारने वर्तवला अंदाज, सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल ?
तसेच यावेळी त्यांनी एका चिनी माणसाशी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. त्या माणसाने चीनच्या अमेरिकेला मागे टाकण्याच्या क्षमतेचे श्रेय त्यांच्या कामगारांना दिले, जे अमेरिकन कामगार साधारणपणे ५० तास काम करतात तर आठवड्यातून ९० तास काम करतात. जर तुम्हाला जगाच्या एक पाऊल पुढे जायचे असेल तर तुम्हाला आठवड्यातून ९० तास काम करावे लागेल, असं त्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world