जाहिरात

Dhurandhar 2: रणवीरच्या यशावर दीपिकाचं मौन का? 'धुरंधर 2' वरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर

Deepika Padukone On Dhurandhar 2: रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' हा सिनेमा कमाईचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत असतानाच, सोशल मीडियावर एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं होतं.

Dhurandhar 2: रणवीरच्या यशावर दीपिकाचं मौन का? 'धुरंधर 2' वरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर
Deepika Padukone On Dhurandhar 2: दीपिकानं ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.
मुंबई:

Deepika Padukone On Dhurandhar 2: रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमा कमाईचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत असतानाच, सोशल मीडियावर एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं होतं. रणवीरची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं या सिनेमाबद्दल सोशल मीडियावर मौन बाळगल्यानं तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात होतं. मात्र, आता दीपिकाने या ट्रोलर्सना आपल्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिलंय.

काय म्हणाली दीपिका?

'धुरंधर: द रिव्हेंज' प्रदर्शित होऊन आता 3 आठवडे पूर्ण होत आले आहेत. या काळात अनेक कलाकारांनी रणवीरचं कौतुक केलं, पण दीपिकाने एकही पोस्ट शेअर केली नव्हती. यावरून तिला सोशल मीडियावर लक्ष्य केलं गेलं. एका व्हायरल पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की, दीपिकाने 500 कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या सिनेमाला 'सायलेंट ट्रीटमेंट' दिली आहे. तिने सिनेमाच्या प्रीमियरला जाणं टाळलं आणि सासू-सासरऱ्यांसोबत सतार वादनाच्या कार्यक्रमाला जाणं पसंत केलं. 

या पोस्टवर कमेंट करताना दीपिकाने लिहिलं की, मित्रांनो, मी हा सिनेमा तुमच्या सर्वांच्या आधी पाहिला आहे, आता सांगा जोक कुणावर झाला?

Latest and Breaking News on NDTV

रणवीरच्या यशाचं सेलिब्रेशन पण ....

दीपिकाने जरी सोशल मीडियावर पोस्ट केली नसली, तरी ती रणवीरच्या यशात सहभागी असल्याचं दिसून आलं आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ती रणवीर आणि तिचे सासरे जगजित सिंग भवनानी यांच्यासोबत मुंबईतील प्रसिद्ध कॅफे आणि डोसा सेंटरमध्ये डिनरसाठी जाताना दिसली होती. 

दीपिकाने यापूर्वी डिसेंबरमध्ये 'धुरंधर'च्या पहिल्या भागाचं भरभरून कौतुक केलं होतं. तेव्हा तिने रणवीरचा अभिमान असल्याचं सांगत फॅन्सना हा सिनेमा पाहण्याचं आवाहनही केलं होतं. यावेळी मात्र तिने सोशल मीडियाच्या ड्राम्यापासून लांब राहून वैयक्तिक पातळीवर आनंद साजरा करण्याला प्राधान्य दिलं आहे.

( नक्की वाचा : Dhurandhar 2 मधील दाऊदचं आजारपण खरं की खोटं? वाचा अंडरवर्ल्डच्या पडद्यामागचं सत्य सांगणारा विशेष Review )

'धुरंधर 2' ने मोडले बाहुबली 2 चे रेकॉर्ड

रणवीर सिंहच्या या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला आहे. अवघ्या 18 दिवसांत या सिनेमाने भारतात 1000 कोटी रुपयांचा  गल्ला जमावला असून पुष्पा 2 नंतर हा टप्पा गाठणारा तो दुसरा वेगवान सिनेमा ठरला आहे. इतकंच नाही तर या सिनेमाने बाहुबली 2 सारख्या मोठ्या सिनेमांच्या कमाईलाही मागे टाकलं आहे. केवळ 11 दिवसांत या सिनेमाने 'धुरंधर'च्या पहिल्या भागाची एकूण कमाई ओलांडली होती. या सिनेमाच्या यशाची घोडदौड अजूनही सुरूच आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com