Hema Malini Dharmendra Love Story: बॉक्सऑफिसवर सुपरडुपर हिट ठरलेला 'शोले' सिनेमा 12 डिसेंबर रोजी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 1975 साली प्रदर्शित झालेल्या शोले सिनेमामध्ये जय आणि वीरू यांच्यातील सच्ची मैत्री पाहायला मिळाली होती. शोले सिनेमाच्या सेटवर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यातील ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन प्रेमास देखील सुरुवात झाली होती. धर्मेंद्र यांनी शोलेमध्ये वीरू आणि हेमा मालिनींनी बसंती हे पात्र साकारलं होतं. पण तुम्हाला माहितीये का शुटिंगदरम्यान हेमा मालिनींवर चांगली छाप पाडण्यासाठी धर्मेंद्र यांनी एकही संधी सोडली नव्हती.
शुटिंगपूर्वीच धर्मेंद्र टाकीवर चढले, अन्...
शोले सिनेमातील धर्मेंद्र यांचा पाण्याच्या टाकीवरील आयकॉनिक सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. टाकीवर चढून वीरूने बसंतीवरील प्रेमाची कबुली दिली होती. पण शुटिंगपूर्वीच त्याच टाकीच्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींना प्रभावित करण्यासाठी प्रयत्न केले होते, पण त्यावेळेस हेमा यांना फारसा काहीही फरक पडला नव्हता.
(नक्की वाचा: Dharmendra Birthday: मला दुःखी करून...धर्मेंद्र यांच्या वाढदिवशी हेमा मालिनींना भावना अनावर; तुम्हालाही रडू कोसळेल)
हेमा मालिनी यांच्यासाठी काहीपण
शोले सिनेमामध्ये अहमदची भूमिका साकारणारे अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी हा किस्सा सांगितला होता. शोलेच्या सिनेमाच्या सेटवरील आठवणी ताज्या करत सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शोले सिनेमाच्या शुटिंगदरम्यान हेमा मालिनींना इम्प्रेस करण्यासाठी धर्मेंद्र यांचे प्रयत्न सुरू होते. सेटवरील टाकी खरी नव्हती ती आर्ट डायरेक्टरने उभारली होती आणि ती मजबूतही नव्हती. केवळ हेमा यांना इम्प्रेस करण्यासाठी धर्मेंद्र टाकीवर चढले आणि रेलिंग क्रॉस करून उभे राहिले. त्यांची ही कृती पाहून रमेश सिप्पी घाबरले आणि "धरमजी-धरमजी" असे ओरडू लागले. यावर धर्मेंद्र यांनी म्हटलं, "काहीही होणार नाही"
(नक्की वाचा: Sunny Deol Emotional Post: ते कायम माझ्यासोबत आहेत...वडिलांच्या निधनानंतर सनीची पहिली प्रतिक्रिया पाहा VIDEO)
हेमा मालिनी देखील हे सर्वकाही पाहत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एकही भाव नव्हता. मी हेमा मालिनींना म्हटलं, हे खूप धोकादायक आहे. यावर कोणतेही भाव व्यक्त न करता त्या केवळ इतकंच म्हणाल्या की, हो धोकादायक आहे.
दुसरीकडे असेही म्हटलं जातं की, हेमा मालिनींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा, यासाठी सेटवर धर्मेंद्र वारंवार री-टेक सीन द्यायचे.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
