'धरतीपुत्र नंदिनी' या टीव्ही शोमध्ये 'आकाश भारद्वाज' ही मुख्य भूमिका साकारणारा टीव्ही अभिनेता अमन जयस्वाल याचा अपघाती मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मुंबईतील जोगेश्वरी भागात एका रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाला. अमनच्या मृत्यूने टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या वृत्तानुसार, अमन त्याच्या बाईकवर ऑडिशनसाठी जात असताना एका ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. अपघातातनंतर पोलिसांनी त्याला तातडीने बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
(नक्की वाचा- Saif Ali khan:'कुर्ता रक्ताने माखलेला, सोबत छोटा मुलगा', सैफ ज्या रिक्षात बसला त्या रिक्षाचालकानं सर्व थरार सांगितला)
अमन जयस्वाल उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी होता. अमनने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. यानंतर त्याने अनेक टीव्ही शोमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. मात्र, 2023 मध्ये प्रसारित झालेल्या 'धरतीपुत्र नंदिनी' या टीव्ही शोमधून त्याला वेगळी ओळख मिळाली.
(नक्की वाचा- Dawood : दाऊदचा दरारा अन् बॉलिवूडचा थरकाप! अभिनेत्री MD कशी वाचली? 'त्या' अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट)
सध्या मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. अभिनेत्याच्या दुःखद निधनाने त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे अमनच्या वडिलांची तब्येतही बिघडली. मिळालेल्या माहितीनुसार, अमनचे वडिलांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world