जाहिरात

Dhurandhar 2: 'धुरंधर 2'ची कमाल ओपनिंग! जवान, पठाणचा विक्रम मोडला, पहिल्याच दिवशी तब्बल 'एवढी' कमाई

चित्रपटाबद्दल बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू असून, 'पठाण' आणि 'जवान' सारख्या चित्रपटांचे विक्रम मोडून पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

Dhurandhar 2: 'धुरंधर 2'ची कमाल ओपनिंग! जवान, पठाणचा विक्रम मोडला, पहिल्याच दिवशी तब्बल 'एवढी' कमाई

Dhurandhar 2 Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज,' म्हणजेच 'धुरंधर २' अखेर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीपासून धुरंधर 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहायला मिळत आहे.  आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्यासारखे दिग्गज कलाकार आहेत. चित्रपटाबद्दल बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू असून, 'पठाण' आणि 'जवान' सारख्या चित्रपटांचे विक्रम मोडून पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

Dhurandhar 2 म्हणजे मुस्लीम विरोधाचं विष कालवण्याचे काम! पंतप्रधानांचे नाव घेत पवारांच्या सहकाऱ्याचा थेट आरोप

बॉक्स ऑफिसवर धुरंधरची हवा.. 

'धुरंधर: द रिव्हेंज'ने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर असे वादळ निर्माण केले आहे की सिनेमा तज्ज्ञही चकित झाले आहेत. १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडला, जो हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला पहिलाच सिनेमा आहे. सॅकनिल्कच्या मते, हा चित्रपट देशभरात ८,९०० हून अधिक शोजमध्ये सुरू आहे आणि पहिल्या दिवशी ₹७५.०६ कोटींची कमाई करून, चित्रपटाचे एकूण निव्वळ कलेक्शन ₹११८.०६ कोटींवर पोहोचले आहे. यामुळे हा चित्रपट केवळ या वर्षातील सर्वात मोठी ओपनिंगच नाही, तर बॉलिवूडच्या इतिहासातीलही सर्वात मोठी ओपनिंग ठरला आहे.

'जवान', 'पठाण' मागे, पहिल्याच दिवशी नवा विक्रम रचला

'धुरंधर २' च्या पहिल्या दिवसाच्या कमाईने 'जवान', 'पठाण', 'स्त्री २' आणि 'ॲनिमल' यांसारख्या मोठ्या चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. 'जवान'ने ₹७५ कोटी, 'पठाण'ने ₹५७ कोटी आणि 'ॲनिमल'ने ₹६४ कोटींची ओपनिंग केली असताना, 'धुरंधर २' ने त्या सर्वांना मागे टाकत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच पेड प्रिव्ह्यूमध्ये विक्रमी कमाई केली होती, ज्यामुळे त्याच्या दमदार ओपनिंगचे संकेत मिळाले होते. आता हे स्पष्ट झाले आहे की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दीर्घकाळ यशस्वी ठरणार आहे.

Raj Thackeray:' 'आधी इन्स्टाग्राममधून बाहेर पडा!"; राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत असं का सांगितलं?

तगडी स्टारकास्ट अन् खुँखार स्टोरी! 

या चित्रपटात रणवीर सिंगसोबत आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आपल्या दमदार दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे आदित्य धर यांनी या स्पाय-थ्रिलरचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर जवळपास १३०० कोटी रुपयांची कमाई केली होती आणि त्याचा सिक्वेल त्याहूनही मोठे यश मिळवण्यासाठी सज्ज दिसत आहे. 'धुरंधर २' ज्या वेगाने प्रदर्शित झाला आहे, ते पाहता हा चित्रपट आपल्या पहिल्याच वीकेंडमध्ये अनेक मोठे विक्रम मोडू शकतो आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक बनू शकतो, असे दिसते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com