- रणवीर सिंगच्या धुरंधर: द रिव्हेंज चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुरुवातीला वर्चस्व गाजवले होते
- मृणाल ठाकूरच्या डकैत चित्रपटाने तीन दिवसांत जगभरात 34.77 कोटी रुपयांची कमाई करून जोरदार यश मिळवले आहे
- डकैत चित्रपटात अनुराग कश्यप, प्रकाश राज आणि अतुल कुलकर्णी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका
बॉक्स ऑफिसवर सध्या दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमधील चुरस अधिक रंगतदार होताना दिसत आहे. 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंगच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर एकतर्फी वर्चस्व गाजवले होते. मात्र, आता जळगावची कन्या आणि लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर हिच्या 'डकैत' चित्रपटाने या वर्चस्वाला तगडे आव्हान दिले आहे. सध्या सिनेविश्वात केवळ एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे अभिनेत्री मृणाल ठाकूर. जळगावची ही लेक आता मोठ्या पडद्यावर रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' ला जोरदार टक्कर देत आहे.
अदिवी सेष आणि मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'डकैत' चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांत जगभरात 34.77 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 6.55 कोटींची सलामी देणाऱ्या या चित्रपटाने देशांतर्गत बाजारपेठेत 19.80 कोटींचा टप्पा गाठला आहे. 10 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या मृणालच्या 'डकैत' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून, अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने कोटींची उड्डाणे घेतली आहेत. या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
हा चित्रपट एका अशा व्यक्तीवर आधारित आहे, ज्याच्यावर न केलेल्या गुन्ह्याचा आरोप लागतो. ज्याच्यावर प्रेम केले, तिनेच विश्वासघात केल्यावर तो तुरुंगातून पळून आपला सूड कसा घेतो, याचे चित्रण यात आहे. 10 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अनुराग कश्यप, प्रकाश राज आणि अतुल कुलकर्णी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत. 'डकैत'मध्ये केवळ मृणाल नाही, तर प्रकाश राज, अनुराग कश्यप आणि अतुल कुलकर्णी यांसारखे तगडे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विश्वासघात आणि सूडाची ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हिंदी आणि तमिळ भाषेत शूट झालेला हा चित्रपट आता रणवीर सिंगच्या चित्रपटाला मागे टाकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world