जाहिरात

Divya Shinde Bigg Boss Marathi: TVवरच सदस्यांना जीवे ठार मारण्याची धमकी, बिग बॉसमधून दिव्या शिंदेची हकालपट्टी

Divya Shinde Bigg Boss Marathi: घरातील सदस्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दिव्या शिंदेला बिग बॉस मराठी कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलंय.

Divya Shinde Bigg Boss Marathi: TVवरच सदस्यांना जीवे ठार मारण्याची धमकी, बिग बॉसमधून दिव्या शिंदेची हकालपट्टी
"Divya Shinde Bigg Boss Marathi: दिव्या शिंदेला बिग बॉसने घराबाहेर काढलं"
Divya Shinde Insta

Divya Shinde Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी सीझन 6' वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. पण सोशल मीडियावर सध्या चर्चा घरातील अतिशय वादग्रस्त विषयाची आहे. बिग बॉसने स्पर्धक दिव्या शिंदेची (Divya Shinde Eliminated) घरातून हकालपट्टी केलीय. दिव्याने भरकार्यक्रमात तलवार चालवण्याचे आणि स्पर्धकांना जीवे ठार मारण्याचे विधान केला. यामुळे दंड म्हणून दिव्या शिंदेला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलंय. मराठी बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच अशी धक्कादायक घटना घडल्याने सर्वांनाच हादरा बसलाय. 

बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय घडलं?

'बिग बॉस मराठी सीझन 6' मध्ये स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये घरामध्ये सहभागी नसलेल्या सदस्याच्या चेहऱ्यावर लाल रंगाने क्रॉस करायचं होतं. तन्वीने दिव्याचं नाव घेतलं, त्यावेळेस दिव्याला प्रचंड राग आला. रागाच्या भरात दिव्याने बिग बॉसच्या घरातील सदस्यांना उद्देशून तलवार चालवण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. राकेश बापटने दिव्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण दिव्या काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर घरातील सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बिग बॉसने दिव्याला तत्काळ बाहेर काढलं.

(नक्की वाचा: Aishwarya Rai: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्याची अभिषेकसाठी ती पोस्ट; त्या एका चुकीमुळे अभिनेत्री होतेय ट्रोल)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com