
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (MHJ) या लोकप्रिय कार्यक्रमाची टीम केवळ प्रेक्षकांना खळखळवून हसवण्यातच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्यातही पुढे आहे , हे त्यांनी यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनमधून दाखवून दिलं. महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टीमने यंदाची दिवाळी बोरिवली येथील सिटीझन वेलफेर असोसिएशन या वृद्धाश्रमाला भेट देऊन साजरी केली. आपल्या शोच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवणाऱ्या या मालिकेच्या कलाकारांनी ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवले.
ओंकार, शिवाली आणि वनिताची विशेष उपस्थिती
ओंकार भोजने या महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये पुनरागमन केले असून तो देखील या अनोख्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता. ओंकारसोबत शिवाली परब आणि वनिता खरातही आवर्जून उपस्थित होत्या. याशिवाय, महाराष्ट्राची हास्यजत्राचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी तसेच महाराष्ट्राची हास्यजत्राचे लेखक-निर्माते सचिन मोटे हे देखील उपस्थित होते.

आणि आजोबांच्या चेहऱ्यावर उमटले हसू
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कलाकारांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत भरपूर वेळ घालवला. त्यांच्यासोबत फराळाचा आनंद घेतला आणि सगळ्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबापासून दूर राहतात, अशा वेळी या कलाकारांच्या आगमनाने त्यांना कुटुंबातील सदस्यांचा सहवास लाभल्यासारखे वाटले. नेहमी टीव्हीवर पाहणाऱ्या त्यांच्या लाडक्या विनोदवीरांना प्रत्यक्षात पाहिल्याने वृद्धाश्रमातील मंडळींच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते.

नक्की वाचा: 300 चित्रपट करणारा सुपरस्टार; पत्नीच्या निधनाने तुटला, अखेर कामवालीच्या नावावर संपत्ती करून संपवलं आयुष्य
ओंकार भोजने म्हणतो की, अवर्णनीय आनंद!
ओंकार भोजने याने म्हटले की,"आम्ही रोज टीव्हीवर लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो, पण आज ज्येष्ठांसोबत प्रत्यक्ष दिवाळी साजरी करताना मिळालेला आनंद अवर्णनीय आहे. दिवाळी म्हणजे 'प्रकाश आणि आनंद वाटणे', आणि आज आम्हाला तो खरा आनंद मिळाला."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world