Ravi Jadhav News: प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा 2010मध्ये बॉक्सऑफिसवर झळकलेल्या "नटरंग" सिनेमाने मराठी सिनेमाचा चेहरामोहराच बदलला. या सिनेमामुळे मराठी सिनेमाला एक नवी ओळख मिळाली. सिनेमामध्ये अतुल कुलकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, प्रिया बेर्डे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अभिनेता अतुल कुलकर्णीने दमदार अभिनय साकारुन प्रेक्षकांचे मन जिंकलं. अतुलने साकारलेल्या "नाच्या" या पात्राचे विशेष कौतुक करण्यात आले. सोनाली कुलकर्णीने सादर केलेल्या लावणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अजय-अतुलने गायलेली तसेच संगीतबद्ध केलेली गाणी प्रचंड गाजली. दरम्यान सिनेमामध्ये दिग्दर्शक रवी जाधव यांनी स्वतः छोटीशी भूमिका साकारली होती, हे तुम्हाला माहितीये का?
नटरंग सिनेमामध्ये रवी जाधवांनीही केले होते काम?
हो, हे खरंय. नटरंग सिनेमामध्ये रवी जाधव यांनीही छोटीशी व्यक्तिरेखा साकारली होती. पण सिनेमा एटिड करताना त्यांनी स्वतःच्या भूमिकेवर कात्री फिरवण्याचा निर्णय घेतला. रवी जाधव यांनी स्वतः याबाबतची माहिती दिलीय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर त्यांनी सिनेमातील फोटो देखील शेअर केलाय. "नटरंगमध्ये छोटीशी भूमिका साकारली होती, पण स्वतःला डिलिट केले... पण हा फोटो टिकलाय... रोल कापला पण फोटो वाचला आणि प्रेक्षकही..." असे गंमतीशीर कॅप्शन रवी जाधवांनी फोटोला दिलंय.
(नक्की वाचा: Soham Bandekar Marriage: आदेश बांदेकरांचा मुलगा सोहमचं लवकरच शुभमंगल सावधान? ही अभिनेत्री होणार सून)
नटरंग सिनेमातील कहाणी
सिनेमामध्ये चाकोरीबाहेर विचार करणाऱ्या आणि सृजनशील व्यक्तीची कथा तसेच संघर्ष मांडण्यात आला आहे. गुणवंत कागलकर उर्फ गुणा यांची भूमिका अतुल कुलकर्णीने साकारलीय. गुणाला तमाशामध्ये राजाची भूमिका साकारायची असते पण त्याला काम मिळत नसल्याने तो स्वतःच तमाशाचा फड काढायचे ठरतो. पुढे मग त्याला राजाऐवजी नाच्याची भूमिका साकारावी लागते. यश, अपयश आणि नंतर पुन्हा मोठा कलावंत अशी कहाणी नटरंग सिनेमामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
(नक्की वाचा: प्रसिद्ध अभिनेत्रीचे 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, पहिल्यांदाच साकारणार खलनायिका)
नटरंग सिनेमा खऱ्या आयुष्यावर आधारित आहे का?
"नटरंग" सिनेमातील कथा आनंद यादव यांच्या 'नटरंग' कादंबरीवर आधारित आहे.