Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai: कुचकट सून तर चेटकीण-वेडी सासू, केदार शिंदेचा नवा सिनेमा येतोय भेटीला

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Marathi Movie: दिग्दर्शक केदार शिंदे नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. काय आहे सिनेमाचे नाव, कधी होणार रिलीज?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Marathi Movie : केदार शिंदेचा नवा सिनेमा येतोय भेटीला"
Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Marathi Movie

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Marathi Movie: 'बाईपण भारी देवा' सिनेमाच्या प्रचंड यशानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहेत. महिलांच्या मनातल्या भावना, त्यांच्या नात्यांमधला विनोद आणि संवेदना पडद्यावर आणण्यात हातखंडा असलेले केदार शिंदे आता नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित या सिनेमाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलंय.

सिनेमाचे नाव काय आहे? कधी होणार सिनेमा रिलीज?

केदार शिंदेच्या (Kedar Shinde) नव्या सिनेमाचे नाव 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' असे आहे. 16 जानेवारीला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे यांची कन्या सना शिंदे (Marathi Actress Sana Shinde) पहिल्यांदाच निर्मितीची धुरा सांभाळत आहे. 

कोण सून आणि कोण सासू?

पोस्टरमध्ये सासू-सुनेची जोडी पाठमोरी दिसत आहे. आता सासू-सूनेची भूमिका कोण साकारत आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय. प्रत्येक घरात, कुटुंबात घडणारी सासू-सुनेच्या नात्याची मजेशीर केमिस्ट्री, जिव्हाळा आणि न संपणारी टोलेबाजी याचे गोड-तिखट चित्रण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट, कारण...: केदार शिंदे

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितले की,"प्रत्येक घरात सासू-सूनेचे नाते वेगळ्या रंगात दिसते. कधी हसू, कधी नोकझोक, कधी भांडण तर कधी काळजी आणि प्रेम. प्रत्येकाच्या कुटुंबातील ही दोन वेगळी व्यक्तिमत्त्वं, दोन विचार आणि दोन घर सांभाळणाऱ्या स्त्रियांचं सामर्थ्य या चित्रपटात पाहायला मिळेल. तसेच हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे, कारण या चित्रपटाच्या निमित्ताने सनाने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे."

Advertisement

सासू-सूनेला सिनेमा आवडेल: बवेश जानवलेकर

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, "केदार शिंदे हे अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक आहेत. त्यांनी प्रेक्षकांना नेहमीच दर्जेदार चित्रपट दिले आहेत. या चित्रपटातही असाच काहीसा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' ही आजच्या पिढीच्या सासू-सूनेची गोष्ट आहे. घरातील प्रत्येक सूनबाई आणि सासूबाईंना ही कथा नक्कीच भावेल आणि त्यांची वाटेल."

झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल म्हणतात,"झी स्टुडिओज प्रेक्षकांसाठी वेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येतात. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' हा चित्रपट घेऊन येत आहोत. सासू-सूनेच्या नात्याचा हा मजेशीर तसाच भावनिक प्रवास प्रेक्षकांना लवकरच अनुभवता येईल."

Advertisement

(नक्की वाचा: मोठा ट्विस्ट! 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील मास्कमॅनचा मुखवटा उतरणार? जानकी-ऋषिकेशच्या 12 वर्षांपूर्वीच्या लव्हस्टोरीशी कनेक्शन)

झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित "अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?" चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल सिनेमाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे.  

Advertisement