जाहिरात

Satish Shah News: सतीश शाह यांची फिल्मी प्रेमकथा, तिनं दोनदा नाकारलं, तिसऱ्या थेट आईवडिलांची भेट अन्...

Satish Shah News: ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. सिनेमा आणि मालिकांमध्ये त्यांनी अधिकतर कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे खासगी आयुष्य देखील एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच होते.

Satish Shah News: सतीश शाह यांची फिल्मी प्रेमकथा, तिनं दोनदा नाकारलं, तिसऱ्या थेट आईवडिलांची भेट अन्...
"Satish Shah News: सतीश शाह यांचे पत्नीवर होते जीवापाड प्रेम"

Satish Shah News: ज्येष्ठ अभिनेते सतीश साह यांनी वयाच्या 74व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. किडनीशी संबंधित आजाराने त्यांना ग्रासले होते. भारतीय टेलिव्हिजनवरील प्रतिभावान कलाकारांच्या यादीमध्ये सतीश शाह यांच्या नावाचाही समावेश आहे. अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी अधिकतर विनोदी भूमिका साकारल्या आहेत. "जाने भी दो यारों" या विनोदी सिनेमाद्वारे त्यांनी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी कित्येक मालिकांमध्ये काम केले, यातील काही मालिका संस्मरणीय ठरल्या. यापैकी "साराभाई वर्सेस साराभाई" ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. दरम्यान कुटुंबापासून दूर राहावे लागेल, असे प्रोजेक्ट सतीश शाह स्वीकारत नसत. यामागील कारण अतिशय स्पष्ट होते ते म्हणजे त्यांच्या पत्नी मधु शाह. सतीश पत्नीसोबत जास्तीत जास्त वेळ राहण्यावर भर देत असत. 

सतीश शाह यांची कारकिर्द | Satish Shah Death News

सतीश शाह अभ्यासामध्ये चांगले होते, पण त्यांचा स्वभाव मिश्किल होता. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर अभिनयामध्ये त्यांची आवड निर्माण होऊ लागली. यानंतर त्यांनी Film and Television Institute of India इन्स्टिट्युमध्ये प्रवेश मिळवला. थिएटरनंतर त्यांना ‘ये जो है जिंदगी' या मालिकेमध्ये काम करण्या संधी मिळाली. यानंतर 'साथ साथ' सिनेमामध्ये त्यांना छोटीशी भूमिका मिळाली होती, ज्यामध्ये  फारुख शेख, दीप्ति नवल आणि नीना गुप्ता ही कलाकार मंडळीही होती. 

सतीश शाह यांच्या पार्थिवाजवळ 'साराभाई वर्सेस साराभाई' च्या कलाकारांनी गाणं का गायलं? देवेनने सांगितलं कारण

(नक्की वाचा: सतीश शाह यांच्या पार्थिवाजवळ 'साराभाई वर्सेस साराभाई' च्या कलाकारांनी गाणं का गायलं? देवेनने सांगितलं कारण)

सतीश शाह आणि मधु यांची पहिली भेट

मधु शाह आणि सतीश शाह यांची 'सिप्टा फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पहिल्यांदा भेट झाली. सतीश यांना मधु प्रचंड आवडल्या आणि त्यांनी प्रपोजही केले. पण मधुने नकार दिला. यामुळे सतीश दुखावले गेले. पण नशीबाने आणखी एक संधी दिली. 'साथ साथ' सिनेमाचे शुटिंग जुहू परिसरातील एसएनडीटी कॉलेजमध्ये होते, याच कॉलेजमध्ये मधु शिकत होत्या. सतीश यांनी पुन्हा प्रयत्न केले, पण यावेळेसही अपयशच पदरी आले. तिसऱ्यांदा मधुने यांनी म्हटलं की, माझ्या आईवडिलांना भेट, त्यांची परवानगी मिळाली तरच लग्न शक्य आहे.

Satish Shah Death:  हसवणारा चेहरा हरपला! 'साराभाई' फेम सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा

(नक्की वाचा: Satish Shah Death: हसवणारा चेहरा हरपला! 'साराभाई' फेम सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा)

त्याकाळी प्रेमविवाहांना इतके प्राधान्य दिले जात नव्हते. टीव्ही कलाकारांकडे गांभीर्याने पाहिले जाते नव्हते. मधु शाह यांच्या आई-वडिलांची परवानगी मिळवणं सतीश शाहांना थोडेसे कठीण गेले, पण यावेळेस प्रयत्नांना यश आले. महिन्याभरात साखरपुडा झाला आणि आठ महिन्यांनंतर 1972 रोजी दोघांचे लग्न झाले. सतीश मधु यांना त्यांची लकी चार्म मानत होते. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com