जाहिरात

सतीश शाह यांच्या पार्थिवाजवळ 'साराभाई वर्सेस साराभाई' च्या कलाकारांनी गाणं का गायलं? देवेनने सांगितलं कारण

'साराभाई वर्सेस साराभाई' चे कलाकार अंत्यसंस्कारादरम्यान मालिकेचं गीत गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते पाहून चाहते भावुक झाले आहेत.

सतीश शाह यांच्या पार्थिवाजवळ 'साराभाई वर्सेस साराभाई' च्या कलाकारांनी गाणं का गायलं? देवेनने सांगितलं कारण

Sarabhai Vs Sarabhai Title Track : दिग्गज अभिनेता सतीश शाह यांचं 25 ऑक्टोबरला मुंबईत वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर वांद्रेतील एका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. येथे अभिनय क्षेत्रातील मित्र, सहकलाकारांनी उपस्थित राहून सतीश शाहला शेवटचं अलविदा म्हटलं. दरम्यान अंत्यसंस्काराचा एक भावुक करणारा व्हिडिओ (Sarabhai Vs Sarabhai Co-Star  Sang The Show Title Track) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये 'साराभाई वर्सेस साराभाई' चे कलाकार अंत्यसंस्कारादरम्यान मालिकेचं गीत गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते पाहून चाहते भावुक झाले आहेत. कलाकारांनी हे गाणं का गायलं याचा खुलासाही झाला आहे. अभिनेता देवेन भोजानी याने याबाबत माहिती दिली. 

देवेनने शेअर केली पोस्ट...

देवेन भोजानी याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. गाणं गात असतानाचा व्हिडिओ शेअर करीत देवेनने लिहिलंय, - हा कदाचित वेडेपणा वाटेल, विचित्रही वाटू शकेल. मात्र काहीही झालं तरी आम्ही एकत्र आल्यावर हे गाणं गातो आणि आजही काही अपवाद नव्हता. असं वाटतंय इंदूने स्वत:च हट्ट करून आम्हाला सामील करून घेतलं. RIP सतीश शाहजी. मला  #SarabhaiVsSarabhai मध्ये दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. तुम्ही आमच्या हृदयात कायम जिवंत राहाल. सुमीत राघवननेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने लिहिलंय - आणि इंदू साराभाईला शेवटचा अलविदा. आम्हाला तुमची आठवण येईल डॅडी. तुम्हाला खूप प्रेम...


सतीश शाहने 1978 मध्ये अरविंद देसाईच्या 'अजीब दास्तान'पासून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 1983 मध्ये 'जाने भी दो यारो'मधून सतीश शाहला खूप प्रसिद्धी मिळाली होती. टीव्हीबद्दल सांगायचं झाल्यास 'फिल्मी चक्कर' आणि विशेषत: 'साराभाई वर्सेस साराभाई' सारख्या मालिकेत त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. सतीश शाह याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या दर्जेदार भूमिकेतून ते चाहत्यांच्या हृदयात आजही जिवंत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com