जाहिरात

Dharmendra धर्मेंद्र यांना जळवण्यासाठी हेमा मालिनींनी खतरनाक व्हिलनसोबत केला रोमान्स! पुढे जे घडलं ते...

Dharmendra News: एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये हेमा मालिनींनी उदयपूर शहरामध्ये झालेल्या 'राजा जानी' सिनेमाच्या शुटिंगदरम्यानचा गंमतीशीर किस्सा सांगितला होता.

Dharmendra धर्मेंद्र यांना जळवण्यासाठी हेमा मालिनींनी खतरनाक व्हिलनसोबत केला रोमान्स! पुढे जे घडलं ते...
"Hema Malini: हेमा मालिनी आणि खतरनाक व्हिलनचा रोमान्स"

Dharmendra News: बॉलिवूडमधील प्रेमकहाणी आणि ब्रेकअपचे असंख्य किस्से तुम्ही ऐकले असतील. काही ऑनस्क्रीन जोडप्यांनी सिनेप्रेक्षकांच्या मनावर राज्य केले तर ऑफस्क्रीन जोडप्यांचीही प्रेमकहाणी प्रचंड गाजल्या, यापैकीच एक लोकप्रिय कपल म्हणजे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र. बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र आणि ड्रीमगर्ल हेमा मालिनी केवळ मोठ्या पडद्यावरील प्रसिद्धी जोडी नव्हती तर ऑफस्क्रीनही त्यांची प्रेमकहाणी रंगली होती. 'शोले', 'सीता और गीता' आणि 'ड्रीम गर्ल' यासारख्या सिनेमांमधील त्यांच्या अफलातून केमिस्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं.

एकमेकांवर प्रचंड प्रेम असतानाही या जोडप्याला त्यांच्या नातेसंबंधांदरम्यान कित्येक आव्हानांचाही सामना करावा लागला. तरीही त्यांच्यातील प्रेम कमी झाले नाही. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980मध्ये लग्न केले. कारकिर्दी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतानाही त्यांच्यामध्ये उत्तम नाते तयार झाले. सह-कलाकारापासून ते खऱ्या आयुष्यातील जोडीदार होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास बॉलिवूडच्या इतिहासात कोरलेला आहे. 

Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाला! घरी कशी काळजी घेतली जाणार? प्रकृतीबाबत डॉक्टरांची मोठी माहिती

(नक्की वाचा: Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाला! घरी कशी काळजी घेतली जाणार? प्रकृतीबाबत डॉक्टरांची मोठी माहिती)

हेमा मालिनी यांनी सांगितला होता गंमतीशीर किस्सा

एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये हेमा मालिनी यांनी सांगितले की, राजा जानी (1972) सिनेमामध्ये हेमा मालिनी यांनी खतरनाक व्हिलन प्रेम चोप्रासोबत काम केले होते. प्रेम चोप्रा यांची त्यांना सर्वात जास्त भीतीही वाटायची. त्यांची भेदक नजर पाहून थरथरायला व्हायचे.

Dharmendra And Hema Malini: हेमा मालिनींना या नावाने हाक मारतात सनी देओल आणि बॉबी देओल, ड्रीमगर्लने केला होता सर्वांसमोर खुलासा

(नक्की वाचा: Dharmendra And Hema Malini: हेमा मालिनींना या नावाने हाक मारतात सनी देओल आणि बॉबी देओल, ड्रीमगर्लने केला होता सर्वांसमोर खुलासा)

उदयपूर शहरामध्ये राजा जानी सिनेमातील गंमतीशीर किस्सा देखील त्यांनी सांगितला. सिनेमातील 'कितना मज़ा आ रहा है' गाणं हेमा मालिनी आणि प्रेम चोप्रा यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. सिनेमामध्ये धर्मेंद्र यांना जळवण्यासाठी मी प्रेम चोप्रासोबत रोमान्स करत होते. प्रेम चोप्रा इतके खूश होते की त्यांनी गाण्यामध्ये एखाद्या हीरोप्रमाणे व्यवहार करणं सुरू केलं आणि हे पाहून धर्मेंद्र प्रचंड चिडायचे." 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com