जाहिरात

Ex Husband च्या साखरपुड्यानंतर समांथाही पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा, चाहत्यांनी जाहीर केली नाराजी

समांथाचा Ex Husband नागा चैतन्य याचा आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. या दोघांचा साखरपुडा हा समांथाच्या चाहत्यांसाठी नाराजीचा विषय बनला होता. तिच्या चाहत्यांनी समांथाबद्दल सहानुभीती व्यक्त केली होती.

Ex Husband च्या साखरपुड्यानंतर समांथाही पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा, चाहत्यांनी जाहीर केली नाराजी
दिग्दर्शकाच्या प्रेमात पडलीय समांथा ?
मुंबई:

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत नुकताच साखरपुडा पार पडला. हा साखरपुडा पार पडत असताना त्याबद्दल समांथाच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नागावर टीका करताना या चाहत्यांनी समांथाबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. हे सगळं होत असताना समांथाही पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. समांथा ही 'द फॅमिली मॅन' चा दिग्दर्शक राज  निदीमोरूच्या प्रेमात पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात हे किती खरं आहे हे अजून कळू शकलेलं नाहीये. मात्र अनेकांना उत्सुकता आहे की खरोखर समांथा आणि राज प्रेमात पडले आहेत का ?

हे ही वाचा: ऐश्वर्या रायपासून वेगळे होण्याच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडले मौन, घटस्फोटाबाबत अखेर सांगितले सत्य

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे बऱ्याच दिवसांपासून डेट करत होते. नागासोबत साखरपुडा झाल्यानंतर शोभिताने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने म्हटलंय की,"What could my mother be to yours? What kin is my father to yours anyway? And how did you and I meet ever? But in love our hearts are as red earth and pouring rain" नागा चैतन्य हा दुसऱ्यांदा लग्नासाठी तयार झाला आहे. त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री समांता रुथ प्रभूसोबत झालं होतं. मात्र त्यांचं वैवाहीक नातं फार काळ टीकलं नव्हतं. 2 ऑक्टोबर 2021 रोजी दोघांचा घटस्फोट झाला होता.

सामंथाच्या आगामी प्रोजेक्टबाबत बोलायचे झाल्या, ती लवकरच 'सिटाडेल: हनी बनी' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत वरुण धवन हा प्रमुख भूमिकेत असणार आहे. समांथा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागड्या अभिपैकी एक आहे.  पुष्पा चित्रपटातील 'ऊ अंटावा' गाण्यामध्ये समांथाने कॅमिओ केला होता. हे गाणी जबरदस्त हिट झालं होतं. समांथाला बऱ्याच व्याधींनी ग्रासलं आहे. घटस्फोटानंतर तिच्या या व्याधींची बरीच चर्चा झाली होती. समांथाच्या चाहत्यांनी तिची ही अवस्था नागा चैतन्यने दिलेल्या मानसिक त्रासामुळे झाल्याचेही आरोप केले होते.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Bigg Boss Marathi 5 : शेवटी आलो, शेवटी जाणार... सूरज म्हणतोय,"ट्रॉफी मीच जिंकणार"
Ex Husband च्या साखरपुड्यानंतर समांथाही पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा, चाहत्यांनी जाहीर केली नाराजी
amitabh-bachchan-advice-to-married-couples-amid-abhishek-bachchan-aishwarya-rai-divorce
Next Article
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चेत अमिताभ बच्चन यांचा विवाहित जोडप्यांना महत्त्वाचा सल्ला