जाहिरात

The Family Man 3 मधील अभिनेत्याचा मृत्यू; हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

Family Man Actor Rohit Basfore Death : रोहित बासफोर त्याच्या 9 मित्रांसह पिकनिकसाठी गेला होता तेव्हा त्याचा धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाला. 

The Family Man 3 मधील अभिनेत्याचा मृत्यू; हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

Family Man Actor Death : सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. 'द फॅमिली मॅन 3' मध्ये झळकलेल्या अभिनेता रोहित बासफोर याचं निधन झालं आहे. रोहितने ओटीटी वेब सीरिज आणि प्रादेशिक टेलिव्हिजन शोमध्येही काम केले होते. रोहितच्या अशा अचानक मृत्यूने सिने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित बासफोर हा रविवारी 27 एप्रिल रोजी दुपारी गुवाहाटीजवळील गर्भंगा धबधब्यावर मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी याबाबत सांगितले की, ही घटना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित बासफोर त्याच्या 9 मित्रांसह पिकनिकसाठी गेला होता तेव्हा त्याचा धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाला. 

(नक्की वाचा - Urine Therapy: परेश रावल यांनी सलग 15 दिवस प्यायली होती स्वत:चीच लघवी; शरीरावर काय परिणाम होतो?

कुटुंबियांचा हत्या झाल्याचा आरोप

रोहितच्या मृत्यूनंतर कुटुंबाने काही लोकांवर हत्येचा आरोप केला आहे. कुटुंबाचा असा दावा आहे की, रोहितचा अलीकडेच रणजीत बसफोर, अशोक बसफोर आणि धरम बसफोर या तीन व्यक्तींशी पार्किंगवरून वाद झाला होता. यावेळी तिघांनीही रोहितला जीवे मारण्याची धमकी दिली होती. नातेवाईकांनी रोहीतच्या जीम मालकावरही संशय व्यक्त केला आहे.

(नक्की वाचा - Pahalgam attack: हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानचा थरकाप, POK मधील दहशतवादी तळाची 'अशी' झाली स्थिती)

याप्रकरणी पोलिसांना सांगितलं की, "सुरुवातीच्या तपासात रोहित चुकून धबधब्यामध्ये पडला असे दिसून आले आहे. पण अभिनेत्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर योग्य कारण समजेल. रोहितच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. रोहितच्या कुटुंबीयांनी ज्या चार आरोपींवर हत्येचा संशय व्यक्त केला आहे ते सध्या फरार आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com