जाहिरात

Shala Marathi Song: शाळा मराठी गाणं रिलीज, छत्रपती संभाजीनगरच्या 12 वर्षांच्या लेकराच्या आवाजाने लावलं वेड

Shala Marathi Song Video: ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या सिनेमातील ‘शाळा मराठी’ (Shala Marathi Song Video) गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.

Shala Marathi Song: शाळा मराठी गाणं रिलीज, छत्रपती संभाजीनगरच्या 12 वर्षांच्या लेकराच्या आवाजाने लावलं वेड
"Shala Marathi Song Video: शाळा मराठी गाणं लाँच"
Krantijyoti Vidyalay - Marathi Madhyam Movie

Shala Marathi Song Video: मराठी माध्यमातील शाळांची संस्कारमूल्ये, त्या शाळांनी घडवलेली पिढी आणि शिक्षकांनी दिलेला अमूल्य वारसा ही सर्व शाळेची माया पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या सिनेमातील ‘शाळा मराठी' (Shala Marathi Song Video) हे धमाल गाणं नुकतेच रिलीज करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी 'क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी' असे म्हणत ‘द फोक आख्यान' च्या हर्ष-विजय आणि ईश्वर सोबत पाच दमदार गाणी चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातील पहिले ‘शाळा मराठी' हे शाळेच्या आठवणी जागं करणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

मराठी शाळेची ओळख, तेथील वातावरण, त्यातील आपुलकी, शिक्षकांचे प्रेम आणि शाळेच्या भिंतीतून मिळालेले संस्कार हे सर्वच या गाण्याच्या प्रत्येक ओळीतून जिवंत होते. रोहित जाधव यांच्या दमदार आवाजास हर्ष–विजय यांचे संगीत आणि गीतकार ईश्वर अंधारे यांच्या मजेशीर शब्दांचा सुंदर मेळ यात अनुभवायला मिळतोय.

मराठी शाळांचं वास्तव, जिद्द आणि ऊर्जा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न : हेमंत ढोमे

गाण्याबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणालाय की, ''क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम'मध्ये आम्ही मराठी माध्यमाच्या शाळांचे वास्तव, त्यांची जिद्द आणि त्यांच्यातील ऊर्जा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘शाळा मराठी' हे गाणे या चित्रपटाच्या आत्म्याला स्पर्श करणारे आहे. मराठी शाळांनी अनेक पिढ्या घडवल्या त्यांचे संस्कार, मूल्य आणि ऊब या गीतात सजीव झाली आहे. 12 वर्षांच्या रोहित जाधवने या गाण्यात रंगत आणलीय. रोहित हा छत्रपती संभाजीनगरचा असून गुरुवर्य अनाथाची माऊली रामेश्वरजी महाराज पवार यांच्या कीर्तन संस्थेत तो गेली सहा वर्षे शिक्षण घेत आहे. एका छोट्या गावचा चिमुकला कीर्तनकार या गाण्यातून त्याची कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असल्याचा मला फार आनंद आहे. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला हे माझे विनम्र अभिवादन आहे”.

"बालपणाची ऊर्जा जाणवली"

संगीतकार हर्ष–विजयने म्हटलंयकी, ''शाळा मराठी हे गाणं करताना आम्हालाही पुन्हा एकदा आपल्या शाळेत गेल्यासारखे वाटले. मातृभाषेची आपुलकी, शिक्षकांचा स्पर्श आणि बालपणाची ऊर्जा आम्ही संगीतामध्ये जाणवून दिली आहे. हे गाणे ऐकताना प्रत्येकाला आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील आणि हीच आमची सर्वात मोठी कमाई आहे. आमचा हा पहिला चित्रपट आहे आणि या गाण्याचा प्रवास खूप अनोखा होता. हे गाणे करताना आम्ही सर्वांनीच खूप मजा केली. दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांचे आम्ही आभारी आहोत; त्यांनी आम्हाला ही संधी दिली.''

The Folk Aakhyan: 'द फोक आख्यान'चे संगीतकार मराठी सिनेसृष्टीही गाजवणार, 5 दमदार गाणी लवकरच येणार भेटीला

(नक्की वाचा: The Folk Aakhyan: 'द फोक आख्यान'चे संगीतकार मराठी सिनेसृष्टीही गाजवणार, 5 दमदार गाणी लवकरच येणार भेटीला)

‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' सिनेमाची स्टारकास्ट

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम'मध्ये दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट दिसणार आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, निर्मिती क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळीची तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com