
Gautami Patil News Song: सबसे कातील' गौतमी पाटीलचं नवी गाणं 'राणी एक नंबर' प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पिवोट म्युझिकने या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याला गायिका सोनाली सोनवणे हिने सुमधूर आवाज दिला आहे, तर गौतमी पाटीलच्या खास अदांनी गाण्याला एक वेगळाच रंग चढला आहे. या गाण्याचे बोल रोहन साखरे यांनी लिहिले आहेत, तर प्रसिद्ध संगीतकार मोहन उपासनी यांनी संगीत दिले आहे.
गाण्याविषयी गौतमी पाटील काय म्हणाली?
गाण्याबद्दल बोलताना गौतमी पाटील म्हणाली, "या गाण्याच्या नावातच 'राणी एक नंबर' आहे, त्यामुळे गाणे नक्कीच एक नंबर असेल. गाणे खूप सुंदर झाले आहे आणि मला शूटिंग करताना खूप मजा आली. मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही हे गाणे नक्कीच आवडेल. तुम्ही या गाण्यावर नक्कीच थिरकणार आहात. तसेच, पिवोट म्युझिक आणि संगीतकार मोहन उपासनी यांचे मी आभार मानते की त्यांनी मला या गाण्यात संधी दिली." गौतमीने प्रेक्षकांना आवाहन केले आहे की त्यांनी 'राणी एक नंबर' गाण्यावर रील्स बनवून तिला टॅग करावे.
गायिका सोनाली सोनवणेने सांगितले, "'राणी एक नंबर' हे एक पूर्णपणे 'फिमेल-सेंट्रिक' गाणे आहे. एक मुलगी जेव्हा आत्मविश्वासपूर्ण असते, तेव्हा ती कशी वागते याचा अभ्यास करून मी गाणे गायले आहे. गाण्याची संपूर्ण टीम स्टुडिओमध्ये उपस्थित होती आणि सर्वांनी मला प्रोत्साहन दिले. गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे."
संगीतकार मोहन उपासनी यांनी गाण्याची कल्पना कशी सुचली याबद्दल सांगितले की, "'एक नंबर' हा शब्द माझ्या डोक्यात घोळत होता. त्या शब्दावर गाणे तयार करण्याचा मी निर्णय घेतला आणि कंपोझिशन करताना ते उत्तम जुळून आले. 'राणी एक नंबर' गाणे सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगमध्ये आहे, याचा मला खूप आनंद आहे."
पाहा VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world