जाहिरात

Govinda Net Worth : गोविंदा पत्नीपासून वेगळं होणार? मुंबईत 3 घरं, कोट्यवधींची कमाई; 'राजाबाबू'ची संपत्ती किती आहे?

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीला अहुजा यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू आहे.

Govinda Net Worth : गोविंदा पत्नीपासून वेगळं होणार? मुंबईत 3 घरं, कोट्यवधींची कमाई; 'राजाबाबू'ची संपत्ती किती आहे?

Govinda Net Worth : अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीला अहुजा यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू आहे. दोघांच्या लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दोघांमध्ये सर्व काही आलबेलं नसल्याचं म्हटलं जात आहे. काही वृत्त माध्यमांनुसार, दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. मात्र अद्याप दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. यादरम्यान गोविंदाच्या सेक्रेटरीने ही सर्व वृत्त फेटाळून लावली आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, त्यावरुन दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा हिची एक मुलाखत व्हायरल झाली होती. ज्यात तिने गोविंदाबद्दल अनेक वक्तव्य केली आहेत.  

गोविंदाकडे किती संपत्ती आहे?
गोविंदा एक यशस्वी कलाकार आहे. आजही गोविंदाची क्रेझ कायम आहे. गोविंदाला बॉलिवूडचा हिरो नंबर 1 म्हणूनही ओळखलं जातं. चित्रपटांसह विविध ब्रँडच्या जाहिरातीतून त्याने मोठी कमाई केली आहे. गोविंदा वर्षाला साधारण 12 कोटी रुपये कमावतो आणि महिन्याचा हिशोब केला तर दरमहिना गोविंदाला एक कोटी रुपये मिळतात. 

Chal Halla Bol : 'कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही?' सेन्सॉर बोर्डाचा अजब फतवा, दलित समाजात संताप

नक्की वाचा - Chal Halla Bol : 'कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही?' सेन्सॉर बोर्डाचा अजब फतवा, दलित समाजात संताप

संपत्तीबद्दल सांगायचं झाल्यास गोविंदाची नेटवर्थ कोटींमध्ये आहे. 2004 मध्ये निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यावेळी गोविंदाची एकूण नेटवर्थ 14 कोटी रुपये होती. मात्र आता 20 वर्षांनंतर त्याची संपत्ती तब्बल 150 ते 170 कोटींपर्यंत पोहोचली आहे. 2004 मध्ये गोविंदा काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून संसदेत पोहोचला होता. 

गोविंदाच्या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं झालं तर मुंबईत त्याची तीन घरं आहेत. जुहूतील त्याच्या घराचं नाव जय दर्शन आहे. मड आयलँडमध्येही त्याची प्रॉपर्टी आहे. याशिवाय रुइया पार्कमधील एक बंगला लीजवर दिला आहे. गोविंदाच्या या प्रॉपर्टीची किंमत कमीत कमी 16 कोटींची असल्याचं सांगितलं जातं. 

मुंबई व्यतिरिक्त गोविंदाजवळ कोलकत्त्यात एक बंगला आहे. त्याने लखनऊमध्ये 90 हजार चौरस फुटाची शेतजमीन खरेदी केली आहे. रायगडमध्येही त्याच्या नावावर फार्म हाऊस आहे. परदेशातही गोविंदाची प्रॉपर्टी असल्याचं सांगितलं जातं. हॉटेल व्यवसायातूनही तो मोठी कमाई करतो. याशिवाय रियल इस्टेटमधील अनेक संपत्तीत त्याने मोठी गुंतवणूक केली आहे. 

एका चित्रपटातून गोविंदा किती कमावतो? 
एका चित्रपटासाठी गोविंदा तब्बल 5-6 कोटी इतके पैसे आकारतो. एखाद्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी तो दोन कोटी घेतो. त्याच्या लग्झरी लाइफस्टाइलची झलक त्याच्या कार कलेक्शनवरुन लक्षात येतं. काही अहवालांनुसार, त्याच्याकडे अनेक लग्झरी कार आहेत. ज्यात Mitsubishi Lancer, Ford Endeavor, मर्सिडीज C220D और मर्सिडीज बेंज GLC सारख्या कारचा समावेश आहे.