हॉलिवूड स्टार दुआ लीपाचा शनिवारी (30 डिसेंबर) मुंबईतील वांद्रे-बीकेसीला कॉन्सर्ट पार पडला. दुआ आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर आहे. ती तिच्या कॉन्सर्टमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या मुंबईतील शनिवारच्या (30 डिसेंबर) कॉन्सर्टची जोरदार चर्चा सुरू आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती. तिच्या कॉन्सर्टची घोषणा काही महिन्यांपूर्वी झाली होती. या कॉन्सर्टमध्ये तिने अनेक गाजलेली गाणी गायली. यादरम्यान तिचं एक गाणं ऐकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुआ लीपानं कॉन्सर्टमध्ये 'लॅविटेटिंग'हे गाणं गायला सुरुवात केली. सगळे तिचं गाणं ऐकण्यात दंग झाले होते. त्याचवेळी तिने शाहरुख खानचं बादशाह चित्रपटातलं 'वो लडकी जो...' हे गाणं गायला सुरुवात केली. लॅविटेटिंग VS वो लडकी जो या गाण्यांवर दुआला थिरकताना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हॉलिवूड स्टारच्या तोंडून बॉलिवूडच्या बादशाहंच गाणं ऐकून जणू काही चाहत्यांचा आनंदाचा डबल डोसच मिळाला. तिच्या या मॅशअपचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय.
लॅविटेटिंग आणि वो लडकी जो... या गाण्यांच्या मॅशअपवर दुआने डान्स देखील केला. त्यामुळे या क्रॉसओव्हरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. शाहरुख खानची मुलगी, सुहाना खानने तिच्या स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत, डोळ्यात हार्ट असणारं, डान्स करतानाचे इमोटीकॉन शेअर केले आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्यात.
(नक्की वाचा: विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 'या' तारखेला होणार रिलीज, का बदलली रिलीज डेट?)
यापूर्वी दुआ लीपाने 2019 मध्ये मुंबईमधील वनप्लस म्यूजिक फेस्टिवलमध्ये सादरीकरण केलं होतं. त्याचबरोबर 2023 मध्ये ती राजस्थानमध्ये आली होती. तिचं नाव गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदविण्यात आलेलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world