जाहिरात

विराट कोहली, प्रियांका चोप्रा, रोनाल्डोसह अनेक सेलिब्रेटींना दणका! इंस्टाग्राममुळे झाला जबरदस्त तोटा

या घटनेला सोशल मीडिया युजर्स "Great Purge of 2026" असे म्हणत आहेत.

विराट कोहली, प्रियांका चोप्रा, रोनाल्डोसह अनेक सेलिब्रेटींना दणका! इंस्टाग्राममुळे झाला जबरदस्त तोटा
  • इन्स्टाग्रामवर Great Purge of 2026 मोहिमेत बनावट व बॉट अकाऊंट्सवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे
  • विराट कोहली, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि प्रियांका चोप्रा यांसह अनेक सेलिब्रिटींचे फॉलोअर्स अचानक कमी झाले आहेत
  • काइली जेनरला सर्वाधिक फटका बसला असून तिने जवळपास चौदाशे लाख फॉलोअर्स गमावले आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Great Purge of 2026: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका रात्रीत मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे. जगातील दिग्गज सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएंसर्सचे लाखो फॉलोअर्स अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेला सोशल मीडिया युजर्स "Great Purge of 2026" असे म्हणत आहेत. यामध्ये विराट कोहली, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि प्रियांका चोप्रा यांसारख्या बड्या स्टार्सना मोठा फटका बसला आहे. 'मेटा'ने बनावट खात्यांविरुद्ध उघडलेल्या या युद्धामुळे जागतिक स्तरावरील सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेचा फुगा फुटल्याची चर्चा आहे. ही केवळ तांत्रिक प्रक्रिया नसून, सोशल मीडियावरील 'फेक इंगेजमेंट'च्या बाजारपेठेला बसलेला मोठा दणका आहे.

मेटाची बनावट अकाऊंट्सवर कारवाई
इन्स्टाग्रामची मूळ कंपनी 'मेटा'ने प्लॅटफॉर्मवरील बनावट (Fake), इनअ‍ॅक्टिव्ह आणि बॉट अकाऊंट्सवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. कंपनीने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केली नसली तरी, जगभरातील युजर्सच्या फॉलोअर्सच्या संख्येत अवघ्या काही तासांत मोठी घट दिसून आली आहे. प्लॅटफॉर्म अधिक पारदर्शक आणि विश्वसनीय बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते.

नक्की वाचा - Dawood Ibrahim: दाऊद, ऋषी कपूर आणि 'तवायफ'चे कनेक्शन! दुबईतील त्या भेटीचा रंजक इतिहास

कोणाचे किती फॉलोअर्स कमी झाले?
या कारवाईत अमेरिकन सोशलाइट काइली जेनरला सर्वाधिक फटका बसला असून तिने जवळपास 14 मिलियन फॉलोअर्स गमावले आहेत. फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे फॉलोअर्स 8 मिलियनने कमी झाले आहेत. याशिवाय टेलर स्विफ्ट, जस्टिन बीबर आणि एरियाना ग्रांडे यांच्या फॉलोअर्समध्येही मोठी घट झाली आहे. भारतीय सेलिब्रिटींमध्ये विराट कोहली आणि प्रियांका चोप्रा यांच्या फॉलोअर्सची संख्याही लक्षणीयरीत्या घटली आहे. केवळ वैयक्तिक सेलिब्रिटीच नव्हे, तर 'BTS' आणि 'BLACKPINK' यांसारख्या प्रसिद्ध के-पॉप ग्रुप्सच्या फॉलोअर्सवरही याचा परिणाम झाला आहे.

नक्की वाचा - थलापती विजयच्या यशानंतर त्रिशाची चर्चा; कोट्यवधी मालमत्तेची मालकीण असलेल्या या अभिनेत्रीची नेटवर्थ माहितीये?

काय आहे 'ग्रेट पर्ज'चे कारण?
सोशल मीडिया तज्ज्ञांच्या मते, इन्स्टाग्रामने स्पॅम अ‍ॅक्टिव्हिटी आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे वाढवलेले फॉलोअर्स हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. आर्टिफिशिअल इंगेजमेंट कमी करून केवळ अस्सल युजर्स प्लॅटफॉर्मवर राहावेत, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यामुळे येणाऱ्या काळात इन्फ्लुएंसर मार्केटिंगमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'ग्रेट पर्ज 2026' मोहिमेमुळे खळबळ उडाली आहे. त्या मोहिमेने सोशल मीडियावर जणू भूकंपच आणला आहे. रोनाल्डोचे तर तब्बल 80 लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत. आता ही कारवाई इथेच थांबणार की अजून कोणाचा नंबर लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com