- दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू प्रेग्नन्सीची चर्चा रंगली आहे
- समंथा आणि प्रोड्युसर राज निदिमोरू यांचं लग्न १ डिसेंबर २०२३ रोजी कोयंबतूर येथे झालं होतं
- समंथा प्रेग्नंट असल्याच्या अफवांना खास सूत्रांनी पुष्टी दिली आहे
Is Samantha Pregnant: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिची ओळख आहे. तिने बॉलिवूडमध्ये ही आपली छाप पाडली आहे. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहील्यानंतर समंथा प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना दिसत आहे. या व्हिडीओत तिचा बेबी बंप स्पष्ट पणे दिसत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये ही चर्चा सुरू झाली आहे. सहा महिन्या पुर्वी समंथाने दुसरं लग्न केलं होतं. त्यानंतर आता तिचा हा व्हिडीओ समोर आला आहे.
समंथाने 1 डिसेंबर 2025 रोजी लग्न केलं होतं. फेमर प्रोड्युसर राज निदिमोरू याच्यासोबत हे लग्न कोईम्बतूर इथं झालं होतं. अत्यंत साध्या पद्धतीने हे लग्न लागलं. त्याला मोजकेच नातेवाईक हजर होते. आता या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. त्यानंतर समंथाचा एक व्हिडीओ समोर आला आहेत. त्यामुळे तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवांना उधाण आले आहे. मात्र ही अफवा नसल्याचं एनडीटीव्हीला सुत्रांनी माहिती दिली आहे. समंथा ही प्रेग्नंट असल्याचं खास सुत्रांनी खात्रीने सांगितले आहे.
समंथाचा नुकताच 'मा इंती बंगारम' हा चित्रपट रिलिज झाला. या चित्रपटाची छोटी सक्सेस पार्टी करण्यात आली. याचा आनंद घेण्यासाठी समंथा आणि राज निदिमोरू यांनी केक कापला. या पार्टीत सामंथाने पांढऱ्या रंगाचा टाईट टी-शर्ट घातला होता. या व्हिडिओमध्ये तिचे पोट थोडे फुगलेले दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिचा 'बेबी बंप' असल्याचा दावा केला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तिला थेट शुभेच्छा ही दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये तो तिचा बेबी बंप आहे हे बोलण्यासाठी वाव आहे. त्यामुळे चाहत्यांनी अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत.
दरम्यान, सामंथाच्या 'मा इंती बंगारम' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 19 जून रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. त्याला संमथाच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 2.54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दोन दिवसांतच या चित्रपटाने एकूण 7.89 कोटी रुपयांचे कलेक्शन केले असून प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. त्यात ही खूष खबर समोर आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना सुखद असा डबल धक्का बसला आहे.
Samantha pregnant agita pola 🥵 Adai raj yenga sammuva potu pregnant akitie da 🔥#samantha #samantharuthprabhu pic.twitter.com/V1Pe8Snf6M
— Billa_2 (@2_billa33825) June 20, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world