जाहिरात

Shefali Jariwala Death: भारतामध्ये Glutathioneची किंमत किती? अँटी-एजिंग औषधे आणि इंजेक्शनव्यतिरिक्त शरीरात ग्लुटाथिओनची पातळी अशी वाढवा

Shefali Jariwala Death: ग्लुटाथिओन एक नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स आहे, जे आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये असते, जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती...

Shefali Jariwala Death: भारतामध्ये Glutathioneची किंमत किती? अँटी-एजिंग औषधे आणि इंजेक्शनव्यतिरिक्त शरीरात ग्लुटाथिओनची पातळी अशी वाढवा
Price Of Glutathione: भारतामध्ये ग्लुटाथिओनची इंजेक्शन-औषधांची किंमत किती?

Shefali Jariwala Death: मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. 27 जून रोजी वयाच्या 42व्या वर्षी शेफालीने या जगाचा निरोप घेतला. रिपोर्ट्सनुसार, शेफालीच्या मृत्यूनंतर तिच्या घरातून मोठ्या प्रमाणात अँटी एजिंग आणि स्किन लायटनिंगची औषधे सापडली, विशेषतः ग्लुटाथिओन आणि व्हिटॅमिन सीचे इंजेक्शन मिळाले. डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच शेफाली जवळपास आठ वर्षांपासून या औषधांचे सेवन करत असल्याचे म्हटलं जातंय. या घडामोडींदरम्यान बहुतांश लोकांना हा प्रश्न पडलाय की, ग्लुटाथिओन म्हणजे काय असते? अँटी एजिंगच्या स्वरुपात ते कसे काम करते आणि भारतामध्ये एका इंजेक्शनची किंमत किती आहे? सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊया..

(नक्की वाचा: Shefali Jariwala Death: Dead On Arrival डेड ऑन अरायव्हल म्हणजे काय?)

ग्लुटाथिओन म्हणजे काय?

ग्लुटाथिओन एक नॅचरल अँटी-ऑक्सिडंट्स आहे, जे आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये असते. जे आपल्या शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते आणि पेशींचे नुकसान होण्यापासूनही रोखते. पण वाढते वय, तणाव, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे शरीरातील ग्लुटाथिओनची पातळी हळूहळू कमी होऊ लागते.

दरम्यान बदलत्या लाइफस्टाइलनुसार भारतामध्ये त्वचेचा रंग उजळण्यासाठी आणि अँटी एजिंगसाठी ग्लुटाथिओनचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. ग्लुटाथिओनमुळे त्वचा गोरी आणि चमकदार होते, असे म्हणतात. म्हणून बहुतांश लोक ग्लुटाथिओनचे इंजेक्शन आणि गोळ्या घेऊ लागले आहेत.

ग्लुटाथिओन इंजेक्शनची किंमत किती आहे?

- देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ग्लुटाथिओनची किंमत वेगवेगळी असू शकते, उदाहरणार्थ
- दिल्ली-गुरुग्राममध्ये ग्लुटाथिओनचे एक इंजेक्शन 4 हजार रुपयांपासून ते 12 हजार रुपयांपर्यंत मिळते. 
- मुंबईमध्ये एक सेशन 8 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 10 इंजेक्शनचे पॅकेज 60 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे.   
- औषधांबाबत सांगायचे झाले तर 30 गोळ्यांचे पाकिट 5 हजार रुपयांपर्यंत मिळते.  

(नक्की वाचा: Shefali Jariwala Death: पहिल्या लग्नात छळ, दुसऱ्यामध्ये आई होण्याचं स्वप्न अपूर्ण! वेदनादायी शेफालीची कहाणी)

ग्लुटाथिओनचे इंजेक्शन आणि औषधे शरीरासाठी किती सुरक्षित आहेत?

तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ग्लुटाथिओनचे इंजेक्शन किंवा औषधांचे सेवन करू नये. अन्यथा ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे अ‍ॅलर्जी, पोटाशी संबंधित समस्या, यकृत किंवा किडनीशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात.

ग्लुटाथिओनची शरीरातील पातळी नैसर्गिकरित्या कशी वाढवावी?

खाद्यपदार्थांच्या माध्यमातून शरीराला ग्लुटाथिओनचा पुरवठा केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ

- हिरव्या भाज्या विशेषतः ब्रोकोली, कोबी, पालक आणि टोमॅटोचे सेवन करावे. 
- लसूण आणि कांदा खावा, यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरामध्ये ग्लुटाथिओन तयार होते. 
- डाएटमध्ये लिंबू, संत्रे, कीवी, स्ट्रॉबेरी आणि आवळा यासारख्या फळांचा समावेश करावा, याद्वारे शरीराला व्हिटॅमिन सी मिळते.  
- पुरेशा प्रमाण झोपणे देखील आवश्यक आहे. 
- ताणतणावापासून दूर राहा आणि नियमित व्यायाम देखील करावा, यामुळे शरीराची रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. 

ग्लुटाथिओनबाबत तज्ज्ञांचे म्हणणं ऐका...

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com