
Zeenat Aman Story : 1970 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आधुनिक अभिनेत्री झीनत अमान आजही, वयाच्या 73 व्या वर्षीही, तितक्याच आधुनिक आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यानंतर या गोष्टीचा प्रत्यय येतो. 70 च्या दशकामध्ये झीनतची चांगलीच क्रेझ होती. पण वैयक्तिक आयुष्यामध्ये या अभिनेत्रीनं तिच्या आईचे मन दुखावले होते.
झीनतने एका वर्षापूर्वी एक किस्सा शेअर केला होता. यात अभिनेत्रीने सांगितले होते की, कशाप्रकारे तिने घरातून पळून जाऊन तिच्या आईचे दुखावले. झीनतने अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या आईला नोकरी सोडावी लागली होती. सेटवर लेकीची काळजी करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
आईबद्दल काय सांगितलं?
झीनतच्या आईचे नाव वर्धिनी शारवाचर आणि वडिलांचे नाव अमानुल्लाह खान होते. या पोस्टमध्ये झीनतने पालकांसोबतच तिच्या आईच्या जर्मन पतीचाही फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने एक लांबलचक नोटही लिहिली होती, ज्यात तिने तिच्या आईबद्दल आठवण सांगितली आहे.
अभिनेत्रीने लिहिले, 'प्रत्येक रविवारी, एक हितचिंतक मला त्याच्या संग्रहातून सुंदर-सुंदर फोटो पाठवतो, ज्यांना तुम्ही झीनत अमानच्या आठवणी म्हणू शकता. या रविवारी मला आईचे दोन फोटो मिळाले, ज्यात त्या माझ्या सख्ख्या आणि सावत्र वडिलांसोबत आहेत. माझ्या आयुष्यात माझ्या आईपेक्षा असामान्य स्त्री कोणी नाही. ती माझी खूप काळजी घेत असे. ती काळाच्या पुढे होती. ती सुंदर आणि शालीन होती.
( नक्की वाचा : Divya Bharti : दिव्या भारतीच्या मृत्यूचे रहस्य 30 वर्षांनंतर उघड, सहकलाकारानं सोडलं मौन )
आईला दुखावले
झीनतमे पुढे लिहिले की, 'आई 50 च्या दशकात वडिलांपासून वेगळी झाली आणि नोकरी करू लागल्या, मला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. आई मला भेटायला येताना भेटवस्तू आणायची. मी अभिनेत्री बनण्याचा विचार केला आणि आईने माझ्यासाठी नोकरी सोडली. माझे सर्व प्रोजेक्ट ती स्वत: पाहात असे. माझ्या कमाईचे योग्य नियोजन करत असे. मला संवाद शिकवते असे. माझा आत्मविश्वास वाढवण्यात मदत करे. पण, मी घरातून पळून गेले आणि आईला दुखावले.
आई म्हणत असे, तिला माझ्यासाठी अनुरुप मुलगा कधीच मिळाला नाही. माझ्या मुलाचा जन्म आईच्या वाढदिवशी झाला तेव्हा गोष्टी सुधारल्या. आईचं 1995 साली निधन झालं. त्यावेळी आपलं सुरक्षा कवच निघून गेलं असं मला वाटलं. आईविना मी अपूर्ण होते, कारण तिच्याबरोबर मला सुरक्षित वाटत असे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world