
Katrina Kaif Pregnancy: बॉलिवूडमधील सुपरस्टार कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल आई-बाबा होणार आहेत. अखेर या सुंदर दाम्पत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. बेबी बम्पसह कतरिनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे कतरिना गर्भवती असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर कतरिनाने चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे. ही बातमी ऐकताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गुड न्यूज देताना कतरिनाने तिचा बेबी बम्प असलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो कतरिना आणि विकी दोघांनी हातात पकडल्याचं दिसून येत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
फोटो शेअर करताना कतरिनाने लिहिलं, आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय सुरू करण्याच्या मार्गावर आहोत.
9 डिसेंबर 2021 रोजी कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नबंधनात अडकले होते. त्यांचं लग्न बॉलिवूडसह चाहत्यांनाही धक्का होता. कतरिता जिथं सुपरस्टार असताना विकी कौशलने काहीच हिट सिनेमे दिले होते. त्याशिवाय दोघांच्या वयामध्येही अंतर आहे. कतरिना ही विकी कौशलपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर अखेर त्यांनी मुलाचा निर्णय घेतला. त्यामुळे चाहत्यांना कतरिना आणि विकीचं बाळ पाहण्यास उत्सुक आहे.
कधी होणार डिलिव्हरी? (Katrina Kaif delivery date)
कतरिनाची प्रेग्नन्सीची बातमी समोर आल्यानंतर आता तिची डिलिव्हरी कधी असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. काहींच्या मते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात कतरिना बाळाला जन्म देऊ शकते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world