जाहिरात

Kyuki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Cast: रोहित सुचांती, शागुन शर्मासह दिसणार हे कलाकार, कधी आणि कुठे पाहता येणार मालिका?

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi : 'क्योंकि सास भी कभी बहू थी २' ही मालिका २९ जुलै, २०२५ पासून रात्री १०:३० वाजता स्टार प्लसवर प्रसारित होईल. तसेच, ती 'जिओहॉटस्टार'वर ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.

Kyuki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Cast: रोहित सुचांती, शागुन शर्मासह दिसणार हे कलाकार, कधी आणि कुठे पाहता येणार मालिका?
Rohit Suchanti and Shagun Sharma

'Kyuki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2' : एकता कपूरची टेलिव्हिजनवरील ऐतिहासिक आणि लोकप्रिय मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्लसवर प्रदर्शित होणाऱ्या या बहुप्रतीक्षित मालिकेत मूळ मालिकेतील कलाकार स्मृती इराणी (तुलसी वीरानी) आणि अमर उपाध्याय (मिहिर) हे त्यांच्या जुन्या भूमिकांमध्ये परतणार आहेत. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यासोबतच, या नव्या सीझनमध्ये सहा नवीन कलाकारही सामील होणार असल्याची माहिती 'टाईम्स नाऊ'ने दिली आहे.

मालिकेत सामील होणारे नवीन कलाकार आणि त्यांच्या संभाव्य भूमिका

रोहित सुचांती: रोहित सुचांती 'क्योंकि सास भी कभी बहू थी २' चा भाग असणार आहे. तो तुलसी आणि मिहिरचा मुलगा 'अंगद वीरानी' ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. एकता कपूरच्याच 'भाग्यलक्ष्मी' मालिकेत 'ऋषी ओबेरॉय' या प्रमुख भूमिकेमुळे तो प्रसिद्धीस आला होता.

(नक्की वाचा-  Shilpa Shirodkar : 'शिल्पा शिरोडकरची गोळी घालून हत्या...' पालकांचे 25 मिस्ड कॉल; अभिनेत्रीने सांगितला किस्सा...)

शगुन शर्मा : शगुन देखील या मालिकेत दिसणार आहे. ती तुलसी आणि मिहिरची मुलगी 'परी वीरानी'ची भूमिका साकारणार आहे. 'इश्क पर जोर नही', 'ससुराल गेंदा फूल २', 'हरफूल मोहिनी' आणि 'ये है चाहतें' यांसारख्या टेलिव्हिजन मालिकांमधील तिच्या भूमिकांसाठी ती ओळखली जाते.

अमन गांधी : 'भाग्यलक्ष्मी' मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेला अमन गांधी तुलसी आणि मिहिरचा दुसरा मुलगा 'हृतिक वीरानी'ची भूमिका साकारणार असल्याची शक्यता आहे.

तनिषा मेहता : एकता कपूरच्या या मालिकेत तनिषा मेहता 'वृंदा पटेल'ची भूमिका साकारताना दिसणार आहे. ती रोहित सुचांतीने साकारलेल्या अंगदच्या भूमिकेची प्रेयसी असणार आहे.

अंकित भाटिया : अंकित भाटिया देखील 'केएसबीकेबीटी २' मध्ये 'वरदान पटेल'ची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

प्राची सिंह : प्राची सिंह, जी यापूर्वी 'प्यार की राहें' या टेलिव्हिजन मालिकेत दिसली होती, ती यात 'आनंदी पटेल'ची भूमिका साकारणार आहे.

(नक्की वाचा -  Star Couple Marriage : बॉलिवूडचं असं लग्न... ज्यामध्ये आले 37 पाहुणे, मात्र खर्च झाला 77 कोटी)

कधी आणि कुठे पाहता येणार मालिका?

'क्योंकि सास भी कभी बहू थी २' ही मालिका २९ जुलै, २०२५ पासून रात्री १०:३० वाजता स्टार प्लसवर प्रसारित होईल. तसेच, ती 'जिओहॉटस्टार'वर ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. या मालिकेची निर्मिती एकता कपूर आणि त्यांची आई शोभा कपूर यांनी 'बालाजी टेलिफिल्म्स'च्या बॅनरखाली केली आहे. या नव्या सीझनमुळे प्रेक्षकांना जुन्या आठवणींना उजाळा देण्यासोबतच, नव्या कथेचा आणि कलाकारांची साथ मिळेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com