
Bollywood News : बॉलिवूडमध्ये भव्य लग्न सोहळ्याचं मोठं क्रेझ आहे. हे वेड गेल्या 10 आणि 12 वर्षांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. रणवीर सिंह-दीपिका पदुकोन, अनुष्का शर्मा- विराट कोहली, प्रियंका चोप्रा-निक जोनस, विक्की कौशल-कतरीना कैफ, आलिया भट्ट-रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणी या स्टार कपलने आपल्या लग्नात बेसुमार खर्च केला. या कपलपैकी एक कपल असंही आहे, ज्याने लग्नात केवळ 37 पाहुण्यांना बोलावलं होतं. या कपलने लग्नात तब्बल 80 कोटींचा खर्च केला होता. या कपलचं लग्न सात वर्षांपूर्वी झालं होतं आणि आज यांना एक मुलही आहे.
लग्नात केवळ 37 पाहुणे...
आपण बॉलीवूडच्या स्टार कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणबद्दल बोलत आहोत. त्यांनी 2018 मध्ये इटलीमध्ये लग्न केलं. रणवीर आणि दीपिकाचे लग्न बी-टाउनमध्ये खूप प्रसिद्ध झाले होते.
हैराण करणारी बाब म्हणजे, या हायसिक्युरिटी लग्नात 77 कोटींचा खर्च झाला होता आणि दीपवीरच्या लग्नात केवळ 37 पाहुणे आले होते. दीपवीरचं लग्न 14 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान झालं होतं. या जोडप्याचं लग्न इटलीतील लेक कोमोमध्ये झालं होतं. हा खासगी सोहळा होता. यासाठी येथे हायसिक्युरिटी होती. रणवीर सी-प्लेनमधून वरात घेऊन आला होता.
कधी आणि कशी सुरू झाली लव्ह स्टोरी?
रणवीर आणि दीपिका पहिल्यांदा 'गोलियों की रासलीला-रामलीला' या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2013 रोजी प्रदर्शित झाला आणि 15 नोव्हेंबर 2018 मध्ये रोजी दोघांनी लग्न केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला. यानंतर दीपवीरने बाजीराम मस्तानी आणि पद्मावत चित्रपटात एकत्र काम केलं. हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. रणवीर आणि दीपिका शेवटी रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये एकत्र दिसले.दीपिकाला 8 सप्टेंबर 2024 मध्ये कन्यारत्न झाला. जिचं नाव दुआ ठेवण्यात आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world