जाहिरात

Kantara Chapter 1 OTT Release: कांतारा चॅप्टर-1 ओटीटीवर पाहाता येणार; कधी, कुठे, कसं सगळी माहिती जाणून घ्या

2022 साली कांतारा हा कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा प्रीक्वल कांतारा ए लेजंड चॅप्टर 1 यानेही पहिल्या भागाप्रमाणेच बॉक्स ऑफीसवर उत्तम कामगिरी केली आहे.

Kantara Chapter 1 OTT Release: कांतारा चॅप्टर-1 ओटीटीवर पाहाता येणार; कधी, कुठे, कसं सगळी माहिती जाणून घ्या
मुंबई:

ऑक्टोबर महिना संपत आला असून या महिन्याच्या अखेरीस चित्रपटप्रेमींना मनोरंजनाची पर्वणी लाभणार आहे. अनेक प्रसिद्ध चित्रपट ओटीटीवर पदार्पण करणार असून, या चित्रपटांची असंख्य सिनेप्रेमी ओटीटीवर कधी बघायला मिळणार याची उत्सुकतेने वाट पाहात होते.यातील सगळ्यात मोठे नाव आहे ते म्हणजे कांतारा चॅप्टर-1(Kantara Chapter-1).  याशिवाय दक्षिणेतील राज्यात धमाल उडवून देणारा कल्याणी प्रियदर्शनची प्रमुख भूमिका असलेला लोकाह चॅप्टर 1 (Lokah Chapter-1)  देखील ओटीटीवर रिलीज होणार आहे. 

नक्की वाचा: अभिनेत्री योगिता चव्हाण-सौरभ चौघुले वेगळे होणार? लग्नाच्या वर्षभरानंतरच चर्चांना उधाण

धनुषची भूमिका असलेला इडली कढाई कुठे पाहाता येईल ? (Dhanush Idli Kadai Movie OTT Release) 

इडली कडाई हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट असून धनुष-नित्या मेनन यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.  या चित्रपटाचं दिग्दर्शन धनुष यानेच केले आहे. गावातील एक तरुण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि कामाच्या शोधात दुबईला जातो आणि त्याच्यासोबत कायकाय होतं हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. राज किरण, सत्यराज यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. 29 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजे आजपासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहाता येईल. हिंदी, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषेतही हा चित्रपट उपलब्ध आहे.  

द विचर सीझन 4 (The Witcher Season 4 OTT Release) ओटीटीवर कधी पाहाता येईल ?

काल्पनिक कथानकावर बेतलेली मालिका द विचरचा चौथा सीझन प्रसिद्ध होणार असून या मालिकेत हेन्री कॅव्हील प्रमुख भूमिकेत आहेत. फ्रेया अॅलन, आन्या चालोत्रा यांच्याही यात भूमिका आहेत. लॉरेन्स श्मिट हिसरीच हे या मालिकेचे निर्माते असून  30 ऑक्टोबर 2025 रोजी ही मालिका नेटफ्लिक्सवर (Netflix Upcoming Series) प्रसिद्ध होत आहे.  

कांतारा चॅप्टर 1 ओटीटीवर कुठे पाहाता येईल (Kantara Chapter 1 OTT Release Date ) 

2022 साली कांतारा हा कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा प्रीक्वल कांतारा ए लेजंड चॅप्टर 1 यानेही पहिल्या भागाप्रमाणेच बॉक्स ऑफीसवर उत्तम कामगिरी केली आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याच्या 27 दिवसांनंतर हा चित्रपट ओटीटीवर पाहाता येणार आहे. कन्नड लोककथेवर आधारीत हा चित्रपट 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्राईम व्हिडीओ वर पाहाता येणार आहे. मात्र या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन कधी पाहाता येईल याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. सुरूवातीला कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ भाषेतच हा चित्रपट उपलब्ध होणार आहे.  (Kantara Chapter 1  Release on Amazon Prime Video) 

नक्की वाचा: दिलीप कुमार यांच्या पुतण्याचे 8 फोटो, कधीकाळी माधुरी दीक्षितसोबतही केलाय रोमान्स

लोकाह चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे पाहाता येईल ? (Lokah Chapter 1 OTT Release)

कल्याणी प्रियदर्शनची मुख्य भूमिका असलेला लोकाह चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा सुपरहिरो चित्रपट सुपरहिट झाला आहे. डॉमिनिक अरूण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट Jio HotStar वर 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com