
दक्षिणेत बॉलिवूडच्या तोडीचे चित्रपट बनतात. काही तर बॉलिवूड पेक्षा किती तरी सरस असतात. मग त्या प्रेमकथा असो की अँक्शनपट असो ते चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. दक्षिणेतले काही अभिनेते आणि अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्येही आपले निशिब अजमावले आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत काही दिग्दर्शकही बॉलिवूडकडे आकर्षित झाले आहेत. त्या पैकीच एक आहेत चिदंबरम. चिदंबरम यांचा 'मंजुम्मेल बॉयज' हा मल्याळी चित्रपट तुफान गाजला. त्याने बॉक्स ऑफीसवर नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले. आता तेच चिदंबरम हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मल्याळी चित्रपट निर्मितीमध्ये चिदंबरम यांचं मोठं नाव आहे. ते आता हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ते फैंटम स्टूडिओ बरोबर काम करणार आहेत. त्याची घोषणाही फैंटम स्टूडिओच्या सीईओ सृष्टी बहल यांनी केली आहे. फैंटम नवनविन प्रयोग करण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे देशातल्या प्रत्येत भागातील वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करण्याचा फैंटम स्टूडिओचा मानस असल्याचे बहल यांनी सांगितले. त्यामुळे चिदंबरम यांच्या बरोबर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या दर्जाचे चित्रपट प्रेक्षकां पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या.
ट्रेंडिंग बातमी - जयंत पाटील यांचा पराभव का झाला?, शरद पवारांनी सांगितलं कारण
चिदंबरम यांचा 'मंजुम्मेल बॉयज' हा चित्रपट भलताच गाजला. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफीसवर साडे तीन कोटींची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटाने जबरदस्त कामगिरी करत तब्बल 242.3 करोड रूपयांची कमाई केली. हा चित्रपट 20 कोटीमध्ये बनवला गेला. मल्याळी चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड त्यांनी तोडून टाकले. शिवाय 2024 मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये समावेशही झाला.
ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांना घरात जागा, पण पक्षात... शरद पवारांचं सूचक वक्तव्य
प्रेक्षकांना काय हवं आहे हे चिदंबरम ओळखून आहे. त्यांनी प्रेक्षकांची नस चांगलीच ओळखलेली आहे. त्यामुळे ते रोमांचक कथानक निवडतात. शिवाय त्या चित्रपटात भव्यदिव्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मोठ मोठे सेट हे त्यांच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. चित्रपटातील अॅक्शन या सर्वांनाच आवाक करत असतात. दरम्यान हिंदी चित्रपट करण्याची संधी मिळत आहे ही आपल्यासाठी मोठी बाब असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. हा चित्रपट करण्यासाठी आपण उत्सुक आहे असेही ते म्हणाले. दक्षिणेत ज्या पद्धतीने काम केले आहे तसेच हिंदीतही करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world