जाहिरात

P Chidambaram : मोदींच्या कट्टर विरोधक काँग्रेस नेत्याला आली चक्कर, पंतप्रधानांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणा लावली कामाला

PM modi on P Chidambaram's Health : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून गुजरातच्या आरोग्यमंत्र्यांनी हॉस्पिटलला भेट दिल्याचे आता समोर आले आहे.

P Chidambaram : मोदींच्या कट्टर विरोधक काँग्रेस नेत्याला आली चक्कर, पंतप्रधानांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणा लावली कामाला

PM Modi : काँग्रेस नेते पी चिदंबरम काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान चक्कर येऊन पडले. गुजरातच्या साबरमतीमध्ये सुरु असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीदरम्यान ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी चिदंबरम यांची प्रकृती बिघडल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. पी चिदंबरम यांना ‘सर्वोत्तम उपचार' मिळावे यासाठी मोदींना आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांना निर्देश दिले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

साबरमती येथीन चिदंबरम यांना तातडीने उपचारासाठी अहमदाबादमधील झायडस रूग्णालयात हलवण्यात आले. गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल  यांनी देखील पी चिदंबरम यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सर्व व्यवस्था आहेत की नाही याची खात्री केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून गुजरातच्या आरोग्यमंत्र्यांनी हॉस्पिटलला भेट दिल्याचे आता समोर आले आहे.

(नक्की वाचा-  मनसेला टार्गेट करणाऱ्यांमागे कदाचित ‘महाशक्ती' तर नाही? रोहिणी खडसेंनी उपस्थित केली शंका)

आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांच्याशी संपर्क साधला. यानंतर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.

(नक्की वाचा-  Rohit Pawar : विधानसभेतील मविआच्या कामगिरीवरुन रोहित पवारांची नाराजी, म्हणाले...)

याआधी मंगळवारी पी चिदंबरम यांच्यासह अनेक काँग्रेस नेते साबरमती आश्रमातील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम अचानक बेशुद्ध पडले. यानंतर काँग्रेस नेते चिदंबरम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांच्या आरोग्याच्या अपडेटची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "अति उष्णतेमुळे मला त्रासाला सामोरे जावे लागले. सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. मी आता पूर्णपणे ठणठणीत आहे. तुम्हा सर्वांचे आभार."

कार्ति चिदंबरम यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं की, "माझे वडील पी चिदंबरम अहमदाबाद येथील गरमी आणि  पाण्याची कमतरतेमुळे बेशुद्ध पडले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: