
Prasad Oak|Manjiri Oak: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक/अभिनेता प्रसाद ओक अक्षरशः थरथरत असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय. त्याच्या गालावर पाच बोटं उमटवल्याचंही दिसतंय. प्रसादच्या गालावर उमटलेली पाच बोटं दुसरेतिसरे कोणी नाही तर यामागे त्याची पत्नी मंजिरी ओकच आहे. दोघांमध्ये इतकं काय घडलं? की त्याच्या वाईट परिणामांना प्रसादला सामोरे जावे लागले.
हातामध्ये ताट घेऊन प्रसाद थरथरतोय, का?
मंजिरी ओकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक हातात ताट घेऊन अक्षरशः थरथरताना दिसतोय. दुसरीकडे त्याच्या कानशिलात लावल्याने गालावर पाच बोटंही दिसत आहेत. ही पाच बोटं बायको मंजिरी ओकनंच त्याच्या गालावर उमटवली आहेत.
पण मंडळींनो हा काही खराखुरा व्हिडीओ नाही. म्हणजे त्यांच्यातील हे वाद काही खरेखुरे नाही. मंजिरी आणि प्रसाद सोशल मीडियावर गंमतीशीर व्हिडीओ शेअर करत असतात. हा व्हिडीओ देखील त्याचाच एक भाग आहे.
तर या कॉमेडी व्हिडीओला मंजिरीने कॅप्शनही दिलंय की, "घरातले सगळे खिचडी खायला तयार होते. याला एकट्यालाच पोळी हवी होती. कुणीतरी म्हणून ठेवलंय, समोर येईल ते गुपचूप खावे".
मंजिरी-प्रसादच्या चाहत्यांना त्यांचा हा व्हिडीओही प्रचंड आवडलाय. चाहत्यांनी एकापेक्षा एक गंमतीशीर कमेंट्स केल्या आहेत.
(नक्की वाचा: Celebrity Couple News: बापरे मी किती कुरुप दिसतो, तू कसं काय लग्न केलंस माझ्याशी? दिग्दर्शकाचा अभिनेत्रीला सवाल Video Viral)

Photo Credit: Prasad Oak Instagram
ek_hota_kavi नावाच्या युजरने " किडनी पिळवटून टाकणारी प्रेम कथा 🔥" अशी कमेंट केलीय.
swapnilartist नावाच्या युजरने म्हटलंय की, "प्रसाद सरांच्या एका शब्दावर मंजिरी मॅडम ने लगेचच पोळ्या बनवायला घेतल्या 😍 असा दरारा असावा माणसाचा 🔥"
(नक्की वाचा: Dashavatar Movie: दशावतार सिनेमाच्या निमित्ताने 3 दिग्गज पहिल्यांदाच एकत्र, रंगपूजा भैरवी गाणं रिलीज VIDEO)

Photo Credit: Prasad Oak Instagram
"म्हणून madam नी सरांच्या गालावर कणिक मळायला घेतलय 😂😂😂" अशी कमेंट expressography नावाच्या युजरने केलीय.

Photo Credit: Prasad Oak Instagram
vinayakvanita_official नावाच्या युजरने कमेंट केलीय की, "😂😂 मित्र मंडळी - पुढील काही दिवस आपल्या सरांना आपली गरज आहे. तरी मंडळाने तातडीने मिटिंग घ्यावी...."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world