
Marathi Actor Tushar Ghadigaonkar Death: मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेता, लेखक तुषार घाडीगावकरचे निधन झाले आहे. तुषार घाडीगावकरने काम मिळत नसल्याच्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. अभिनेता अंकुर वाढवेने इंस्टाग्राम पोस्ट करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या दुर्दैवी घटनेने मराठी सिनेविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
Hindi Controversy: 'अरे खुळ्यांनो, विरोध हिंदीला नाही..', मराठी अभिनेत्याची खरमरीत पोस्ट
मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरच्या निधनाने सिनेविश्वात एकच खळबळ उडाली आहे. अभिनेता अंकुर वाढवेने आपल्या अधिकृत इंन्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत तुषारच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. “मित्रा का? कशासाठी? कामं येतात जातात, आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत. तुषार घाडीगांवकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो,” असं अंकुरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मुळचा कणकवलीचा असलेल्या तुषार घाडीगावकर याने नाटकातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्याने अनेक गाजलेल्या मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केले होते. तुषारने लवंगी मिरची, भाऊबळी, उनाड, मन कस्तुरी रे, हे मन बावरे, झोंबिवली, अशा चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. एका हरहुन्नरी कलाकाराने घेतलेल्या एक्झिटने सिनेसृष्टी हादरुन गेली असून अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world