Prajakta Gaikwad Kanyadan: 'स्वराज्यरक्षक संभाजी' या लोकप्रिय मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं 2 डिसेंबर रोजी धुमधडाक्यात लग्न पार पडलं. शंभुराज खुटवडसोबत प्राजक्ताने लग्नगाठ बांधलीय. प्राजक्ताचा पुण्यामध्ये ग्रँड विवाहसोहळा पार पडला. विवाह सोहळ्याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण लग्नातील कन्यादानाच्या विधीची सर्वाधित चर्चा ऐकायला मिळतेय. प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञांनीही प्राजक्ताचं कन्यादान केले. फोटो-व्हिडीओ पाहून त्यांचे आणि प्राजक्ताचे नाते काय आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
प्राजक्ताचं कन्यादान या वास्तूतज्ज्ञांनी केलं
वास्तूतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनीही प्राजक्ताचं कन्यादान केले. कन्यादानाचा विधी करतानाचा भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आनंद पिंपळकर प्राजक्ताला आपल्या मुलीसारखं मानतात. त्यामुळे त्यांनाही कन्यादानाचा मान देण्यात आल्याचं म्हटलं जातंय. तिचे कन्यादान करताना वास्तूतज्ज्ञ पिंपळकर भावुक झाले होते.
प्राजक्ता गायकवाडच्या आईवडिलांनीही केलं कन्यादान
लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक मोठी गोष्टी असते आणि तिच्या आईवडिलांसाठी कन्यादानाचा क्षण अतिशय भावुक तसेच महत्त्वाचा असतो. प्राजक्ताचे कन्यादान करताना तिचे आईवडील भावुक झाले होते. प्राजक्ता आणि तिच्या आईला अश्रू अनावर झाले होते. या भावनिक आणि महत्त्वाच्या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
प्राजक्ता आणि शंभुराजचा सुंदर लुक
पुण्यामध्ये प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड यांचा विवाहसोहळा राजेशाही थाटामध्ये पार पडला. सेलिब्रिटींसह राजकारण्यांनीही लग्नसोहळ्याला उपस्थिती दर्शवली. लग्नाच्या मुख्य विधीसाठी प्राजक्ताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. त्यावर गोल्डन ज्वेलरी, नथ, बांगड्या असे अनेक पारंपरिक दागिने घातले होते. शंभुराजनंही पांढऱ्या रंगाचा अंगरखा पॅटर्नचा पोशाख परिधान केला होता. दोघांचाही लुक चाहत्यांना प्रचंड आवडला.
(नक्की वाचा: VIDEO: 'रिसेप्शन आहे की सर्कस?' प्राजक्ता गायकवाडवर नेटकरी संतापले, 'ती' गोष्ट खटकली)
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे प्राजक्ताला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमध्ये तिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world