जाहिरात

Priya Berde News: सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, ही आहे मालिका

Priya Berde News: प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार भूमिकेमध्ये दिसणार आहेत. कोणत्या भूमिकेमध्ये त्या झळकणार आहेत, वाचा सविस्तर माहिती....

Priya Berde News: सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, ही आहे मालिका
Priya Berde News: प्रिया बेर्डे यांची दमदार भूमिका
Star Pravah Channel

Priya Berde News: आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांना आपण अनेक कलाकृतींच्या माध्यमातून भेटत आलोय. प्रिया बेर्डे यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना एक नवी अनुभूती मिळालीय. स्टार प्रवाह चॅनेलवरील 'काजळमाया' (Kajalmaya TV Serial) मालिकेतून कनकदत्ताच्या रुपात त्या पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 

कोण आहे कनकदत्ता?

चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रवीण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया मालिका. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. चेटकीण वंश वाढवण्याचे एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. कनकदत्ता ही पर्णिकाची आई. सुडाच्या भावनेने पेटलेली, अत्यंत खुनशी, मोठे डोळे आणि आपल्या चेटकीण मुलीबद्दल अभिमान बाळगणारी. आपल्या मुलीने म्हणजेच पर्णिकाने चेटकीण वंश पुढे वाढवावा एवढीच कनकदत्ताची इच्छा आहे. याच हेतूने ती पर्णिकाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला खत पाणी घालते. कनकदत्ता आणि पर्णिका आपले ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार का याची उत्कंठावर्धक गोष्ट काजळमाया मालिकेतून पाहायला मिळेल.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Star Pravah Channel

(नक्की वाचा: Manache Shlok: 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव अखेर बदलले, आता नव्या नावासह नव्या तारखेला होणार प्रदर्शित)

कनकदत्ता भूमिकेविषय प्रिया बेर्डेंनी काय प्रतिक्रिया दिली? 

कनकदत्ता या भूमिकेविषयी सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या,"माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा पद्धतीची भूमिका मी कधीही साकारलेली नाही. कनकदत्ताला पाहता क्षणीच धडकी भरते. ती बेमालूमपणे वेषांतर करते. तिला संमोहन विद्या अवगत आहे. या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरू नका नवी गूढ मालिका काजळमाया 27 ऑक्टोबरपासून रात्री 10. 30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com