Tejashree Pradhan Subodh Bhave New Serial: छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि प्रतिभावान अभिनेता सुबोध भावेची जोडी नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या नवीन प्रोजेक्टबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी 'झी मराठी चॅनेल'वरील नवीन मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.
तेजश्री प्रधानला छोट्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा
तेजश्री प्रधानने 'होणार सून मी ह्या घरची', 'अगंबाई सासूबाई', 'प्रेमाची गोष्ट', यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःचे विशेष स्थान निर्माण केलंय. काही महिन्यांपूर्वीच तिने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्याने प्रेक्षकवर्ग नाराज झाले होते. पण चाहत्यांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा देखील दर्शवला होता. अखेर तेजश्री प्रधानला (Tejashree Pradhan Subodh Bhave New Serial) छोट्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांनी इच्छा पूर्ण झालीय.
(नक्की वाचा: तेजश्रीने 'जान्हवी'चे मंगळसूत्र अजूनही सांभाळून ठेवलंय, कारण…)
तेजश्री आणि सुबोधचे कमबॅक
झी मराठी चॅनेलवरील तेजश्रीची (Tejashree Pradhan Subodh Bhave New Serial) 'होणार सून मी ह्या घरची' तर सुबोध भावेची 'तुला पाहते रे' मालिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या होत्या. आता दोघंही या नवीन मालिकेद्वारे 'झी मराठी चॅनेल'वर कमबॅक करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय.
(नक्की वाचा: Tejashri Pradhan: ये नशा ये खुशी, अब न कम हों कभी... तेजश्री प्रधान नव्या रुपात येतेय प्रेक्षकांच्या भेटीला)
दरम्यान मालिकेचे नाव काय असणार आहे, याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलीय.
Watch Promo: Tejashree Pradhan Subodh Bhave New Marathi Serial On Zee Marathi
'हॅशटॅग तदेव लग्नम्' सिनेमानंतर नवा प्रोजेक्ट
अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) ही फ्रेश जोडी यापूर्वी 'हॅशटॅग तदेव लग्नम्' या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. शुभम फिल्म प्रोडक्शनचा हा सिनेमा 20 डिसेंबर 2024 रोजी बॉक्सऑफिसवर रिलीज झाला होता. आजच्या काळातील 'हॅशटॅग' ही संकल्पना आणि लग्न या विषयावर हा सिनेमा आधारित होता. शेखर विठ्ठल मते निर्मिती या सिनेमाचे दिग्दर्शन, लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले होते. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानने एकत्र काम केले. प्रेक्षकांना सिनेमामध्ये लग्नकार्यातील धमाल पाहायला मिळाली. याशिवाय आजच्या काळातील लग्न, पिढीचे विचारही तसेच दोघांच्या प्रवासाची पार्श्वभूमीही वेगळी असल्याने चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भावली होती.