
Kapil Sharma Show : कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा यांने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या तिसऱ्या सीझनमधून दमदार पुनरागमन केले आहे. यासोबतच त्यांनी 'किस किसको प्यार करूं 2' या त्यांच्या चित्रपटाचीही घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी कपिल शर्माने कॅनडामध्ये रेस्टॉरंट उघडलं होतं. मात्र काही दिवसातच बिष्णौई गँगकडून त्याच्या रेस्टॉरंटवर गोळीबार करण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगचा गँगस्टर हरी बॉक्सर याने हा हल्ला केल्याचं समोर आलं होतं. दरम्यान पुन्हा एकदा कपिल शर्मा वादात सापडला आहे.
मनसे नेता अमेय खोपकर यांनी ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये येणारे कलाकार आणि स्वत: कपिल शर्मा मुंबई ऐवजी बॉम्बे शब्दाचा वापर करीत आहे. वारंवार कपिल शर्माकडून मुंबईचा अपमान केला जात असल्याचा आरोप अमेय खोपकरांकडून करण्यात आला आहे. बॉम्बेचं अधिकृत नामकरण होऊन 30 वर्षे झाली तरीही बॉलिवूडमधील कपिल शर्मा शो यामध्ये मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला जात आहे. 1995 महाराष्ट्र शासन आणि 1996 मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंती वजा इशारा देण्यात आल्याचं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा - कपिल शर्माच्या कॅफेवर हल्लाचं कारण काय? बिश्नोई गँगचा खुलासा, ऑडियो क्लिप जारी
बॉलिवूडमध्ये अनेकदा मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला जातो. कपिल शर्माच्या शोमध्ये येणारे अनेक सेलिब्रिटी बॉम्बे असा उल्लेख करतात. स्वत: कपिल शर्मा बॉम्बे असा उल्लेख करताना दिसतो. त्याला टपिल शर्मा म्हटलं तर चालणार आहे? सतत टपिल शर्मा..टपिल शर्मा म्हटलं तर चालणार नाही ना, त्यामुळे त्यांनीही मुंबईचं नाव मुंबई घ्यावं असंही अमेय खोपकर यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world