जाहिरात

Mumbai News : अभिनेत्याच्या लेकीचे कानातले गायब, पोलीस लागले कामाला; एका दागिन्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!

अभिनेत्रीने कानातले इतके महाग आहेत की, या किमतीत मुंबईतील ४० व्या मजल्यावर 2 बीएचके घर येईल.

Mumbai News : अभिनेत्याच्या लेकीचे कानातले गायब, पोलीस लागले कामाला; एका दागिन्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!

Mumbai News : चित्रपट निर्माती आणि फॅशन स्टायलिस्ट रिया अनिल कपूर हिचा एक दागिना चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, न्यूयॉर्कमध्ये एका फॅशन शोला जात असताना रिया कपूर हिच्या मेकअप आर्टिस्टच्या हँडबॅगमधून १.३५ कोटींचे हिऱ्यांनी जडलेले कानातले चोरीला गेले. धक्कादायक बाब म्हणजे हे कानातले मुंबईतील मेहता आणि गोयंका ज्वेलर्सकडून भाड्याने घेतले होते. 

मुंबईतील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सवलीन सिंह गेल्या ७ वर्षांपासून रिया अनिल कपूरसह काम करते. २९ एप्रिल रोजी न्यूयॉर्कमधील नेट गाला फॅशन शोच्या कार्यक्रमासाठी रिया कपूरला आमंत्रित करण्यात आलं होतं. संपूर्ण टीमही रियासोबत न्यूयॉर्कला जात होती.


रिया अनिल कपूरने सांगितलं नेमकं काय घडलं?

मेकअप टीमसोबत रिया कपूरने मुंबईतील मेहता ज्वेलर्स आणि गोयंका ज्वेलर्समधून दोन जोडी महागडे कानातले भाड्याने घेतले होते. सवलीन सिंहने हे दोन्ही बॉक्स आपल्या हँडबॅगमध्ये ठेवले होते. सर्वांनी २७ एप्रिलच्या रात्री १०.२५ वाजता मुंबईतून अमिराती फ्लाइटने उड्डाण केलं. मुंबईहून दुबईला आणि दुबईहून न्यूयॉर्कच्या कॅनेडी एअरपोर्टवर टीम २८ एप्रिलच्या सायंकाळी ५.३० वाजता पोहोचली. यानंतर सर्वजण न्यूयॉर्कमधील हॉटेल पियरमध्ये आपआपल्या खोलीत निघून गेले.

नक्की वाचा - Deool Band 2 : 'देऊळ बंद 2'ने रचला इतिहास, 583 % नफा; 2026 चा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट


मुंबईला आल्यानंतर केली एफआयआर...

हॉटेलच्या खोलीत सवलीन सिंहने जेव्हा शिरीनला झुमके देण्यासाठी बॉक्स उघडायला सांगितलं तेव्हा दोन्ही बॉक्स रिकामी होते. मेहता ज्वेलर्सच्या पन्ना आणि हिरेजडीत सोन्याच्या झुमक्याची किंमत ६६ लाख आणि गोयंका ज्वेलर्सच्या जाम्बियन हिरे आणि सोन्याचा काठ असलेल्या झुमक्याची किंमत ६९ लाख इतके होते. सवलीन सिंहने मुंबईला परतल्यानंतर मुंबईच्या सहार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीची केस दाखल करून तपास सुरू केला आहे. 

मुंबई एअरपोर्टपासून न्यूयॉर्कपर्यंतची टाइमलाइनचा तपास...

पोलिसांनी सांगितलं की, मेकअप आर्टिस्ट सवलीन सिंह हिच्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार रिया कपूरच्या टीमसोबत न्यूयॉर्कला जात असताना भाड्याने घेतलेले १.३५ कोटी रुपयांचे कानातले चोरीला गेले. एअरपोर्टपासून हॉटेलपर्यंत संपूर्ण टाइमलाइन तपासली जात आहे. ही चोरी मुंबई एअरपोर्टवर, विमानात की न्यूयॉर्क पोहोचल्यानंतर झाली याचा शोध घेतला जात आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com