बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक कलाकार आले आणि गेले. अनेकांनी आपल्या मेहनती बरोबरच आपल्या अभिनयाने एक वेगळी छाप सोडली आहेत. त्यांचा अभिनय कधीही विसरणे शक्य नाही. आपण त्या पैकीच एका अभिनेत्रीबाबत आज जाणून घेणार आहोत. या अभिनेत्रीने अनेक अडचणी असतानाही बॉलिवूडमध्ये आपले नाव सुवर्णाक्षराने कोरले आहे. ही अभिनेत्री केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर मराठी चित्रपटातही आपल्या वेगळ्या भूमिकांनी नेहमीच चर्चेत राहीली आहे. या अभिनेत्रीचा नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपट थेट ऑस्करपर्यंत पोहोचला आहे. ओळखलत का? आपण चर्चा करतोय लापता लेडीज फेम अभिनेत्री छाया कदम यांची. त्यांनी या चित्रपटात मंजू माईची भूमिका साकारली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लापता लेडीज या चित्रपटात मंजू माईच्या भूमिकेत छाया कदम यांनी आपली वेगळीच छाप पाडली. प्रेक्षकांनाही त्यांनी ही भूमिका खूप आवडली. छाया कदम यांनी या वर्षी झालेल्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही भाग घेतला होता. या वेळी रेड कार्पेटवर छाया यांनी केलेला डान्स कोणीही विसरले नाही. खरंतर छाया कदम कान्समध्ये ग्रँड प्रिक्स अवॉर्ड जिंकणारी दिग्दर्शक पायल कपाड़िया यांच्या चित्रपटातील कलाकार होती. चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारामुळे छाया यांनी रेड कार्पेटवर धम्माल डांन्स केला होता. त्यांच्या बरोबर अन्य कलाकारांनाही धम्माल केली होती. दरम्यान छाया यांचा लापता लेडीज हा चित्रपट ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणे तितकेसे सोपे नाही. पण छाया कदम यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेक अडचणी असतानाही त्यांनी आपल्या यशाची वाट निवडली होती. 12 वी ला असताना त्या नापास झाल्या होत्या. पण त्यांनी हिंम्मत हरली नाही. त्यांनी पुढे विलेपार्ले इथून टेक्सटाइल डिजाइनचा कोर्स केला. कोर्स करत असतानाच त्या कबड्डीही खेळायच्या. कबड्डी बरोबर स्टे शो पण त्या करत होत्या. कबड्डी खेळताना त्या केवळ हौस म्हणून नाही तर व्यावसायिक कबड्डी खेळल्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही प्रतिनिधीत्व केलं आहे.
त्या कबड्डी ही खेळत होत्या. शिवाय त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही कबड्डी खेळल्या आहेत हे त्यांच्या फार थोड्या चाहत्यांना माहित असेल. पण ज्या वेळी त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली त्यावेळी सर्व काही बदलून गेलं. त्यांचा लूकही बदलला. त्यामुळे आधीच्या छाया कदम ओळखणे अवघड होवून बसल्या. मात्र असं असलं तरी नवा लूक घेतला असला तरी त्या आजही जुन्या गोष्टी विसरलेल्या नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world