जाहिरात

पुष्पराजच्या फॅन्सची गर्दी, गेट तुटलं, आणि.. संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीचा नवा Video

Allu Arjun : हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.

पुष्पराजच्या फॅन्सची गर्दी, गेट तुटलं, आणि.. संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीचा नवा Video
मुंबई:

हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. 14 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये प्रेक्षक पायऱ्यावरुन उतरताना दिसत आहेत. व्हिडिओतील आठव्या सेकंदला काही जण एका जखमी व्यक्तीला बाहेर नेताना दिसत आहेत. ही घटना सध्या हैदराबाद शहरात चर्चेचा विषय बनली असून त्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीचा हा नवा व्हिडिओ आहे. 14 सेकंदाच्या या क्लिपमध्ये ऑडिओ नाही. पण गर्दी एका दरवाजा ठोठावताना दिसत आहेत. दोन्ही बाजूचे लोखंडाचे गेट उखडण्यात आलेत. तसंच जमीनीवर कागज आणि प्लास्टीकच्या पाण्याच्या बाटल्या आस्ताव्यस्त पसरल्या आहेत. त्या घटनेचं गांभीर्य दाखवणारा हा व्हिडिओ आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते.

( नक्की वाचा : Allu Arjun Story फ्लॉवर नाही फायर ! लाजरा मुलगा कसा बनला सर्वात मोठा 'स्टायलिश स्टार' )

संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीचा हा नवा व्हिडिओ रात्री 9.15 चा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जून थिएटरमध्ये पोहण्याच्या 15 मिनिटं आधीचा हा व्हिडिओ आगगे. पोलिसांनी केलेल्या आरोपानुसार अल्लू अर्जून आल्याची बातमी पसरल्यानंतर गर्दीचा गोंधळ उडाला. प्रत्येक जण अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी धडपड करत होता. त्यामध्ये अनेक जण एकमेंकावर पडले. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

अल्लू अर्जुनचं नाव आरोपी क्रमांक 11 म्हणून निश्चित करण्यात आलं आहे. त्याला महिलेच्या मृत्यू प्रकरणात 13 डिसेंबर रोजी हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. तेलंगणा उच्च न्यायालयानं त्याला त्याच दिवशी चार आठवड्यांचा अंतरिम जामीन दिला. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी त्याची जेलमधून सुटका झाली.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com