जाहिरात
Story ProgressBack

काजोलची सहकलाकार नूर मालाबिका दासचा मृत्यू, कुजलेल्या अवस्थेत पंख्याला लटकत होता मृतदेह

नूर मालाबिका दास सोशल मीडियावर सक्रिय होती. तिने पाच दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता.

Read Time: 2 mins
काजोलची सहकलाकार नूर मालाबिका दासचा मृत्यू, कुजलेल्या अवस्थेत पंख्याला लटकत होता मृतदेह
मुंबई:

सिनेक्षेत्रातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. अभिनेत्री काजोलसह 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये भूमिका निभावलेली अभिनेत्री आणि कतर एअरवेजची पूर्व एअर हॉस्टेस नूर मालाबिका दास हिचं निधन झालं आहे. अभिनेत्री तिच्या मुंबईस्थित घरी मृतावस्थेत आढळली. नूरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या 32 व्या वर्षी अभिनेत्रीच्या आत्महत्येने सिनेसृष्टीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. 

गळफास घेत आत्महत्या...
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी 6 जून रोजी नूर मालाबिका दासचा मृतदेह तिच्या लोखंडवाला घरातून ताब्यात घेतला. येथे नूरने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. मृत्यूचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

पोलिसांना कशी मिळाली माहिती?
नूर मालाबिकाच्या शेजारी राहणाऱ्यांना तिच्या घरातून दुर्गंधी येत होती. शेजारच्यांनी ओशिवारा पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी नूरच्या घराचं दार तोडलं आणि आत शिरले. यावेळी नूरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पंख्याला लटकताना दिसला. 

नक्की वाचा - प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरावर मोठा दरोडा, 10 तोळे सोने लंपास

कोण आहे नूर मालाबिका दास?
नूर मालाबिका दास 32 वर्षांची होती. तिने अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. यामध्ये सिसकिया, वॉकमॅन, तिखी चटणी, जघन्या उपाय, चरमसुख, देखी अनदेखी, बॅकरोल हलचल यांचा समावेश आहे. 

5 दिवसांपूर्वी शेवटची पोस्ट...
नूर मालाबिका दास सोशल मीडियावर सक्रिय होती. तिने पाच दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. आता त्यावर चाहत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. 


 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
अभिनेता ते नेता... सिनेसृष्टीनंतर राजकीय मैदान गाजवणाऱ्या पवन कल्याणचं महाराष्ट्र कनेक्शन
काजोलची सहकलाकार नूर मालाबिका दासचा मृत्यू, कुजलेल्या अवस्थेत पंख्याला लटकत होता मृतदेह
shatrughna-sinha-mistaken-as-raman-raghav-serial-killer-saved-his-life-by-running-away-from-crowd
Next Article
बॉलिवूड अभिनेत्याला सीरिअल किलर समजून घेरलं, पळ काढला नसता तर गेला असता जीव
;