जाहिरात

Top Trending: पाकिस्तानात 'या' भारतीय चित्रपटाला मिळतोय सॉलिड रिस्पॉन्स, कमाई ही बक्कळ

पाकिस्तानच्या टॉप 10 यादीत रोमान्स, कॉमेडी, हॉरर आणि ॲक्शन यांचा समतोल पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे, या यादीत एकही पाकिस्तानी चित्रपट नाही.

Top Trending: पाकिस्तानात 'या' भारतीय चित्रपटाला मिळतोय सॉलिड रिस्पॉन्स, कमाई ही बक्कळ

नेटफ्लिक्सवर (Netflix) चित्रपटांचे मानांकन (रँकिंग) दररोज बदलत असते. मात्र, पाकिस्तानमध्ये हिंदी चित्रपटांचे असलेले आकर्षण आजही कायम असल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. पाकिस्तानात भारतीय चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहीले जातात. त्यांना बॉलिवूडचं मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे. 1 डिसेंबर 2025 रोजीच्या पाकिस्तानमधील टॉप ट्रेंडिंग (Top Trending) चित्रपटांची यादी जाहीर झाली. त्यात हा मनोरंजक ट्रेंड पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानी चिपत्रट शौकीनांना बॉलिवूडचे चित्रपट पसंत पडत आहे. त्यात ही जो चित्रपट क्रमांक एकवर आहे त्याचे नाव ऐकले तर तुम्ही ही हैराण व्हाल. 

या आठवड्यात वरुण धवनची मुख्य भूमिका असलेली रोमँटिक कॉमेडी (Romantic Comedy) चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' पहिल्या क्रमांकावर (नंबर वन पोजिशन) आपले स्थान टिकवून आहे. FlixPatrol च्या अहवालानुसार, पाकिस्तानी प्रेक्षकांना या चित्रपटाची हलकीफुलकी कथा आणि विनोदी-रोमँटिक केमिस्ट्री (Chemistry) खूप आवडत आहे. पाकिस्तानात या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. लोका हा चित्रपट आवर्जून पाहात असल्याचं ही समोर आलं आहे. हा चित्रपट पाकिस्तानमध्ये Top Trending दिसत आहे. 

नक्की वाचा - Gemini च्या मदतीने स्वतःला बनवा खेळण्यासारखे!, हे प्रॉम्प्ट्स करा कॉपी-पेस्ट, मग पाहा काय होते कमाल

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari) हा चित्रपट पाकिस्तानात अव्वल स्थानी आहे. या चित्रपटातील गाणी, विनोद आणि कलाकारांची केमिस्ट्री प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अक्षय कुमार अभिनीत कोर्टरूम कॉमेडी ड्रामा (Courtroom Comedy Drama) 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3)  आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. तर, 'आर्यन' (Aryan) या चित्रपटाने या आठवड्यात मोठी झेप घेत थेट 5 स्थानांवरून तिसऱ्या क्रमांकावर  झेप घेतली आहे.  त्यामुळे पाकिस्तानात भारतीय चित्रपटांचा दबदबा दिसून येत आहे. 

नक्की वाचा - Nanded News: पोलीसांनी उकसवलं, भावाला भडकवलं, सक्षमच्या हत्ये आधी काय घडलं? प्रेयसी आंचलचे धक्कादायक खुलासे

चार्टमध्ये 'जिंगल बेल हाइस्ट' (Jingle Bell Heist) या फेस्टिव्ह (Festive) थीम असलेल्या कॉमेडीने एक स्थानाने वर येत चौथा क्रमांक पटकावला. मात्र, 'धूम 2' (Dhoom 2) हा चित्रपट एका स्थानाने खाली सरकत पाचव्या क्रमांकावर आला आहे. 'होमबाउंड' (Homebound), 'फ्रँकनस्टाइन' (Frankenstein) आणि 'डाइनिंग विद द कपूरस' (Dining With The Kapoors) यांसारख्या चित्रपटांचे स्थान मात्र घसरले आहे. यादीतील शेवटच्या दोन स्थानांवर 'इन युवर ड्रीम्स' (In Your Dreams) आणि 'एक चतुर नार' हे चित्रपट आहेत. जे अनेक दिवसांपासून याच क्रमांकावर कायम आहेत. एकूणच, नेटफ्लिक्स पाकिस्तानच्या टॉप 10 यादीत रोमान्स, कॉमेडी, हॉरर आणि ॲक्शन यांचा समतोल पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे, या यादीत एकही पाकिस्तानी चित्रपट नाही. फक्त भारतीय आणि हॉलिवूड (Hollywood) चित्रपटांचेच वर्चस्व आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com