जाहिरात

पंचायतच्या या अभिनेत्याने सैफ-करीनाच्या लग्नात घासली भांडी, सांगितली भावुक करणारी संघर्षकथा

पंचायत वेबसीरिजमध्ये नवऱ्यामुलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने आपल्या संघर्षाच्या दिवसांमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्सच्या लग्नसोहळ्यामध्ये वेटर म्हणून काम केले आहे.

पंचायतच्या या अभिनेत्याने सैफ-करीनाच्या लग्नात घासली भांडी, सांगितली भावुक करणारी संघर्षकथा

पंचायत या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. फुलेरा गावातील सेक्रेटरीसह या सीरिजमधील सर्वच व्यक्तिरेखांनी लोकांच्या मनावर छाप सोडली आहे. सीरिजमधील फुलेरा गावात स्वतःच्या लग्नाची वरात घेऊन येणाऱ्या नवऱ्यामुलानेही अभिनयाच्या जोरावर चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. 'गजब बेज्जती है यार' नवऱ्यामुलाचा हा डायलॉग खूपच हिट ठरला होता. नवऱ्यामुलाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आसिफ खान असे आहे. याच आसिफने त्याच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्सच्या लग्नामध्ये वेटर म्हणूनही काम केले होते.

(ट्रेडिंग न्यूज: विराट आणि वामिकाने असे केले फादर्स डे सेलिब्रेशन, अनुष्का शर्माने शेअर केला फोटो)

सैफ-करीनाच्या लग्नामध्ये घासली होती भांडी 

पंचायत वेबसीरिजमध्ये नवऱ्यामुलाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आसिफ खानने शानदार काम केले आहे. आसिफ खानच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पहिल्या दोन सीझनमध्ये किरकिऱ्या स्वभावाचा जावई बनलेल्या आसिफने तिसऱ्या सीझनमध्ये आपल्या चांगुलपणाने लोकांची मने जिंकली. दरम्यान एका मुलाखतीमध्ये आसिफने इंडस्ट्रीमधील त्याची संघर्षकथा सांगितली, जी जाणून घेतल्यानंतर कोणीही नक्कीच भावुक होईल. आसिफ खानने मुलाखतीत सांगितले की, मुंबईमध्ये काम मिळवण्यासाठी धडपडत करत होता, तेव्हा पोट भरण्यासाठी वेटर म्हणून काम केले आहे. यादरम्यान सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नसोहळ्यामध्येही वेटर म्हणून काम केले. 

हीरो मटेरिअल नसल्याचे सांगत आसिफला अनेकांनी नाकारले होते. 

(ट्रेडिंग न्यूज: मिथुन चक्रवर्तींच्या या चुकीमुळे जाऊ शकला असता मोठ्या अभिनेत्याचा जीव, थोडक्यात बचावला सुपरस्टार)

आसिफ खानने कित्येक सिनेमांमध्येही केलेय काम 

आसिफने मुलाखतीदरम्यान असेही सांगितले की, मुंबईमध्ये आल्यानंतर बराच संघर्ष करावा लागला. राहण्याचा-खाण्यापिण्याचा खर्च भागवण्यासाठी आसिफने कित्येक हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले आहे. भांडी देखील घासली आहेत. यादरम्यान वर्ष 2012मध्ये सलमान खान आणि करीना कपूरचे लग्न झाले होते, त्यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा ताज हॉटेलमध्ये पार पडला होता. त्याच वेळेस आसिफ ताज हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. हॉटेलमध्ये करीना-सैफच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा सुरू असल्याचे असमजल्यानंतर आपल्या आवडत्या स्टार्संना पाहायला जाऊ शकतो का? अशी परवानगी आसिफने मॅनेजरकडे मागितली. पण मॅनेजरने नकार दिल्याने आसिफ भांडी घासण्याचे काम सुरू ठेवले. त्याच दिवशी आसिफने ठरवले की काहीही झाले तरी अभिनेता होण्याचे स्वप्न कायम जिवंत ठेवणार. 

(ट्रेडिंग न्यूज: रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप करणं भोवले, आता अभिनेत्रीने धाडली 100 कोटींची मानहानीची नोटीस)

सहा वर्षांनंतर आसिफने कित्येक सिनेमांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या. ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून आसिफने सलमान खानचा सिनेमा 'रेडी', ऋतिश रोशनचा सिनेमा 'अग्निपथ'मध्येही काम केले आहे. अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेम कथा' या सिनेमामध्येही आसिफ झळकला होता. पण 'पंचायत' वेबसीरिजमुळे आसिफला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
विराट आणि वामिकाने असे केले फादर्स डे सेलिब्रेशन, अनुष्का शर्माने शेअर केला फोटो
पंचायतच्या या अभिनेत्याने सैफ-करीनाच्या लग्नात घासली भांडी, सांगितली भावुक करणारी संघर्षकथा
singer alka-yagnik-diagnosed-with-rare-disease loses-hearing know details
Next Article
गायिका अलका याज्ञिकला दुर्मिळ आजार, दोन्ही कानांवर गंभीर परिणाम