जाहिरात

नशीब असावं तर असं! इन्स्टा रीलमुळे 'ती'ला थेट प्रभासच्या मोठ्या सिनेमात मिळाला लीड रोल 

Who Is Imanvi: प्रभासच्या आगामी सिनेमामध्ये नव्या अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे. सोशल मीडियावर पहिला फोटो पाहताच सिनेरसिक झाले घायाळ....

नशीब असावं तर असं! इन्स्टा रीलमुळे 'ती'ला थेट प्रभासच्या मोठ्या सिनेमात मिळाला लीड रोल 

Who Is Imanvi: साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या आगामी सिनेमाचे नाव 'फौजी' असल्याचे म्हटले जात आहे. हनु राघवपुडी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. 17 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये या सिनेमाची घोषणा करण्यात आली. प्रभासच्या या सिनेमामध्ये नवीन अभिनेत्री झळकणार आहे. चित्रपटाच्या शुभमुहूर्तावर नव्या चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रभासच्या अभिनेत्रीचे नाव 'इमानवी' असे आहे. पण इमानवी नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हनु राघवपुडी दिग्दर्शित ऐतिहासिक सिनेमाद्वारे इमानवी तिच्या अभिनय क्षेत्रातील कारर्कीदीस सुरुवात करत आहे. 

Kandahar Hijack आधारित वेब सीरिज 'IC 814'मध्ये दहशतवाद्यांना हिंदू नावं का दिली?

(नक्की वाचा: Kandahar Hijack आधारित वेब सीरिज 'IC 814'मध्ये दहशतवाद्यांना हिंदू नावं का दिली?)

कोण आहे इमानवी?

इमानवीचे खरे नाव इमान इस्माइल आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्या संख्या देखील भलमोठी आहे. इमानवी ही सोशल मीडिया स्टार आहे. सिनेमाच्या रिलीजपूर्वीच इमानवीला प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली आहे. मूळची दिल्लीतील रहिवासी असणारी इमानवी डान्सर, कोरिओग्राफर आणि अभिनेत्री देखील आहे. रील्समुळेच तिच्या करिअरला कलाटणी मिळाली आहे.  

प्रभासचा आगामी सिनेमा 1940च्या दशकात कथेवर आधारित आहे. ज्यामध्ये एक योद्धा आपल्या मातृभूमीला न्याय मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीने संघर्ष करतो, याची कहाणी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. एकूणच प्रभासच्या चाहत्यांना पुन्हा एकदा ऐतिहासिक विषयावरील सिनेमा पाहायला मिळणार आहे. 

प्रभास कोणत्या भूमिकेत दिसणार ?

सुरुवातीला सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेमध्ये मृणाल ठाकूर दिसणार असल्याचे म्हटले जात होते. पण आपण या सिनेमाचा भाग नाही, असे तिने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामद्वारे स्पष्ट केले. दरम्यान इमानवीला बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमामध्ये मिथुन चक्रवर्ती, जया प्रदा यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार प्रभास या सिनेमामध्ये ब्रिटीश सैन्यातील सैनिकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 

बाईईईईई.....प्रेयसी असतानाही निक्कीशी गुलुगुलु, रितेश देशमुख Bigg Boss स्पर्धकावर वैतागला

(नक्की वाचा: बाईईईईई.....प्रेयसी असतानाही निक्कीशी गुलुगुलु, रितेश देशमुख Bigg Boss स्पर्धकावर वैतागला)

पुण्यात गणरायाच्या स्वागताला मराठी सेलिब्रेटींचा थाट, कलावंत ढोल-ताशा पथकाची कशी सुरु आहे तयारी?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: