
Pushpa 2 Booking Tickets Record : अल्लु अर्जुनचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमा 'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबर 2024ला रिलीज होणार आहे. या सिनेमाची चर्चा भारतातच नव्हे तर परदेशातही सुरू आहे. जवळपास 400 कोटी रुपये बजेट असणाऱ्या या चित्रपटाने रिलीजपूर्वीच अमेरिकेत सुमारे 1.4 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. त्याचबरोबर सिनेमाने रिलीजपूर्वीच अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग 30 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. 'बुक माय शो' या तिकीट पोर्टलनुसार, 'पुष्पा 2: द रुल' सिनेमाचे सर्वाधिक महागडे तिकीट मुंबईतील मल्टिप्लेक्स मेसन पीव्हीआर: जिओ वर्ल्ड ड्राइव्हवर 3 हजार रुपयांच्या किमतीत विकले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याच मल्टिप्लेक्समध्ये 'भुल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' या चित्रपटांची तिकिटे रिलीजपूर्वी जवळपास2 हजार 700 रुपयांना विकली गेली होती. त्यामुळे अल्लु अर्जुनने या शर्यतीत कार्तिक आर्यन आणि अजय देवगणलाही मागे टाकले आहे.
#Pushpa2 priced at Rs.3000 at PVR's most luxurious Maison Jio World Drive. pic.twitter.com/JOm2hsMulu
— LetsCinema (@letscinema) December 1, 2024
(नक्की वाचा: रिंकू राजगुरू दिसणार नव्या रूपात, 'जिजाई' सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न)
दिल्ली एनसीआरमधील एका थिएटरमध्ये 'पुष्पा 2'सिनेमाच्या तिकिटाची किंमत 1 हजार 800 रुपये इतकी आहे तर बंगळुरूमध्ये या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंग तिकिटासाठी प्रेक्षक एक हजार रुपये मोजत आहेत. दिल्लीमध्ये या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगचे दर पाहून या तिकिटाच्या किमतीची आणि सिनेमाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. मुंबई आणि बंगळुरूमध्ये तिकिटाची किंमत 1 हजार ते 1 हजार 600 रुपये आहे.
(नक्की वाचा: हॉलिवूड स्टार दुआ लीपाचा, बॉलिवूड बादशहाच्या गाण्यावर दबरदस्त परफॉर्मन्स)
सॅकलिंकच्या अहवालानुसार, ‘पुष्पा: द रुल' सिनेमाने आतापर्यंत भारतातील प्रमुख शहरांमध्ये सुमारे 50 हजार तिकिटांची विक्री केली आहे. याद्वारे चित्रपटाने आतापर्यंत 1.51 कोटी रुपये कमावले आहेत. 500 कोटी रुपयांचे बजेट असणारा 'पुष्पा 2: द रुल' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world