जाहिरात

3 चित्रपट, 3200 कोटींची कमाई, 1 वर्षात तुटला होता साखरपुडा, सध्या आहे टॉपची हिरोईन, ओळखलं का?

कर्नाटकच्या कोडागु जिल्ह्यात अभिनेत्रीचा जन्म झाला आहे.

3 चित्रपट, 3200 कोटींची कमाई, 1 वर्षात तुटला होता साखरपुडा, सध्या आहे टॉपची हिरोईन, ओळखलं का?

या फोटोत दिसणारी मुलगी आजच्या घडीला सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. तिच्या तीन चित्रपटांनी एकत्रितपणे सुमारे 3400 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ती सलमान खानसोबतही एका चित्रपटात झळकली आहे. ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ओळखलंत का? आम्ही बोलत आहोत रश्मिका मंदान्नाबद्दल. (Rashmika Mandanna) तिचा नुकताच सलमान खानसोबत 'सिकंदर' चित्रपट प्रदर्शित झाला. जरी या चित्रपटाला फार मोठे यश मिळाले नसले, तरी त्याने बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कर्नाटकच्या कोडागु जिल्ह्यात जन्मलेली आणि वाढलेली रश्मिकाने 2016 मध्ये कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी' मधून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटात तिचा सहकलाकार रक्षित शेट्टी होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती रक्षित शेट्टीच्या जवळ आली. दोघांनी काही काळानंतर साखरपुडा केला. मात्र, 2018 मध्ये त्यांचा साखरपुडा तुटला. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. 'किरिक पार्टी' नंतर तिने 'गीता गोविंदम', 'डियर कॉमरेड', 'भीष्म' आणि 'सीता रामम' यांसारख्या अनेक यशस्वी तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. 2012 मध्ये 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने तिला राष्ट्रीय स्तरावर प्रचंड यश मिळवून दिले. ज्यात तिचा सहकलाकार अल्लू अर्जुन होता.

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिग बातमी - Pahalgam attack: भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर जगाचा पाठिंबा कुणाला? अमेरिका, रशिया, चीन कुणाच्या बाजूनं?

रश्मिकाने 'गुडबाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती रणबीर कपूरसोबत 'ॲनिमल' मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान चालला होता.  या चित्रपटाने 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. तिचा 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1700 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई  केली आहे. 29 वर्षीय रश्मिका मंदान्नाचe विकी कौशलसोबतचा 'छावा' हा चित्रपट जबरदस्त यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने 66 दिवसांत 600 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये आयुष्मान खुरानासोबतची हॉरर-कॉमेडी 'थामा', तमिळ चित्रपट 'कुबेरा' आणि तेलुगू चित्रपट 'गर्लफ्रेंड' यांचा समावेश आहे.