Dhurandhar Movie Latest News : एखादा चित्रपट हा फक्त मनोरंजनासाठीच नसतो, तर त्याच्या माध्यमातून वर्षानुवर्षे दडवलेलं सत्यही समोर येतं. धुरंधर चित्रपट प्रदर्शीत झाल्यानंतर पाकिस्तानमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. विशेषत: रहमान डकैतबाबतही धक्कादायक खुलासे समोर आले. अशातच इंटरनेटवर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हबीब जान बलोच हा व्यक्ती रहमान डकैतचा जवळचा मित्र असल्याचा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे. हबीब जान बलोचने धुरंधर पाहिल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.हबीबने या व्हिडीओच्या माध्यमातून पाकिस्तानची पोलखोल केलीय. धुरंधर चित्रपटाच्या माध्यमातून सत्य समोर आलं आहे. जे पाकिस्तान कधीही दाखवू शकला नाही. भारतीय सिनेमाने ती सत्यता समोर आणली,असं हबीबने म्हटलं आहे.
'मी चित्रपट दोन वेळा पाहिला'
या व्हिडीओत हबीब व्हिडीओत सांगतात की, त्याने हा चित्रपट दोनदा पाहिला आहे आणि त्याला हा चित्रपट खूप आवडला आहे. बलोचने चित्रपटाचे तंत्रज्ञान,कथा आणि सादरीकरणाबाबत कौतुक केलं आहे.जर चित्रपटात आणखी एक-दोन चांगली गाणी असती, तर मजा आली असती, असंही तो म्हणाला.
नक्की वाचा >> Raigad News मंगेश काळोखे हत्याप्रकरणी मोठा ट्वीस्ट, तो व्हिडीओ आला समोर, आमदार महेंद्र थोरवेंचं खळबळजनक विधान!
'रहमान डकैत हा हिरो होता'
हबीब जान बलोच व्हिडीओत सांगतात की, रहमान डकैतला एक चांगला माणूस आणि हिरो म्हणतात. चित्रपटात जरी त्याला खलनायकासारखे दाखवले गेले असले,तरी तो खऱ्या आयुष्यात तसा नव्हता.जे सत्य पाकिस्तान दाखवू शकला नाही,ते भारताने दाखवले. हबीब जान बलोचचं म्हणणं आहे की, ‘धुरंधर'या चित्रपटात रेहमान डकैतच्या आयुष्यातील असे काही पैलू दाखवले गेले आहेत,जे पाकिस्तान कधीही दाखवू शकला नाही.भारतीय सिनेमाने ती सत्यता समोर आणली.जी कथा स्थानिकांनी लपवली होती.
नक्की वाचा >> Vande Bharat Video : वंदे भारत ट्रेनमध्ये जेवताना 100 वेळा विचार करा! जेवणात काय काय आढळलं? प्रवासी संतापले
सोशल मीडियावर गदारोळ
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @the_verifiedsource या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 25 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.तर 1 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.तसच व्हिडिओवर हजारो कमेंट्सचा वर्षावही करण्यात आला आहे. कोणी चित्रपटाचं कौतुक करत आहे, तर कोणी रेहमान डकैतला हिरो म्हणून दाखवल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world