![Rinku Rajguru: 'रिंकू आणि मी ठरवूनच...','त्या' फोटोवरुन कृष्णराज महाडिक पहिल्यांदाच थेट बोलले Rinku Rajguru: 'रिंकू आणि मी ठरवूनच...','त्या' फोटोवरुन कृष्णराज महाडिक पहिल्यांदाच थेट बोलले](https://c.ndtvimg.com/2025-02/q3rdihr_rinku-rajguru-_625x300_10_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
खासदार धनंजय महाडिक यांचा धाकटा मुलगा कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा (Krishnaraj Mahadik Marriage) एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या फोटोवरुन दोघांच्या लग्नाची चर्चा ही जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे हा फोटो व्हायरल होण्या आधी दोन आठवड्यांपूर्वीच धनंजय महाडिक यांनी कृष्णराज यांच्या लग्नाबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. या वर्षात कृष्णराजचं लग्न करायचंय. 2025 चा हा माझा संकल्प असल्याचं ते यावेळी म्हणाले होते. त्यानंतर कृष्णराज आणि रिंकूचा फोटो समोर आला. या फोटोबाबत आता स्वत:कृष्णराज यांनी पहिल्यांदा थेट प्रतिक्रीया दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे कृष्णराज यांनीच पुढे येत आता याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की माझी सर्वांना विनंती आहे, माझ्या आणि रिंकूच्या फोटोमुळे गैरसमज करून घेऊ नका. त्या माझ्या एक चांगल्या मैत्रिण आहेत. कोल्हापुरात एका कार्यक्रम होता. म्हणून रिंकू कोल्हापूरात आल्या होत्या. त्या वेळी आमची भेट झाली. आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो. तिथे आम्ही फोटो काढला. तो माझ्या ऑफिस टीमकडून पोस्ट केले गेला. त्या फोटोची भरपूर चर्चा बाहेर झाली. ज्या चर्चा केल्या जात आहेत, तसं काहीही नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
या फोटोची चर्चा संपुर्ण महाराष्ट्रा होत असताना महाडिक कुटुंबातही या फोटोची चर्चा असल्याचे त्यांनी सांगितलं. सर्व जण नेमकं काय सुरू आहे अशी विचारणा करत आहेत. त्यामुळे तुम्ही समजता तसं काही नाही. गैरसमज कुणीच करून घेऊ नका असंही त्यांनी सांगितलं. खरं तर आम्ही ठरवूनच भेटलो होतो. मंदिराच्या दर्शनासाठी देखील एकत्रच गेलो होतो. परंतु त्या फोटोमुळे वेगळा अर्थ काढला जात आहे. तर कृपया कुणीही त्यातून वेगळा अर्थ काढू नये.
माझ्या वडीलांनी काही दिवसापूर्वी माझ्या लग्नाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावेळी आम्ही आमच्या कुटुंबाचा एक व्हिडीओ शुट करत होतो. त्यामुळे अनेक लोकांना वाटलं की माझं आणि रिंकूचं काही तरी सुरू आहे. पण आम्ही केवळ चांगले मित्र आहोत. त्याच्या पलिकडे आमच्या दोघांमध्ये काही ही नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतो की, तसं काही समजून घेऊ नका. माझं कुटुंब एकत्र आल्यानंतर मजा-मस्ती करतं, पण साहेब त्या ब्लॉगमध्ये माझ्या लग्नाबाबत बोलतील हे मला देखील अपेक्षित नव्हतं असंही त्याने स्पष्ट केलं.
अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले", असं कॅप्शन देत कृष्णराज महाडिक यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती. कृष्णराज आणि रिंकू या दोघांचीही सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या मोठी असल्याने काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला. अनेक लाईक्स आणि कमेंट्स या फोटोवर येऊ लागल्या. अनेकांना "एक नंबर जोडी आहे" अशी कमेंट करत त्याचं लग्न ठरल्यापर्यंत चर्चा पुढे नेली. अनेकांनी दोघांचं अभिनंदन केलं. दोघांचं ठरलं का? लग्न करण्याचा विचार आहे की काय? मग कधी आणि कसं जुळलं? असे प्रश्न चाहत्यांनी विचारले होते. त्यानंतर आता कृष्णराज यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world