
Riteish Deshmukh: महाराष्ट्राचा लाडका दादा बॉलिवूडसह मराठीसिनेविश्व गाजवणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेश देशमुख त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो लवकरच राजा शिवाजी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरु आहे. या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानच रितेश देशमुखने एक मोठे आवाहन केले ज्यानंतर त्याला 10, 000 हून अधिक मेल आल्याचे समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या बहुचर्चित चित्रपटाची सध्या त्याच्या चाहत्यांना आणि शिवप्रेमींना चांगलीच उत्सुकता लागली आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. साताऱ्यामध्ये याचे चित्रिकरण केले जात असून रितेश देशमुखचा खास लूकही समोर आला होता. रितेशच्या चित्रपटातील दमदार लूकची माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. अशातच या चित्रपटाबाबतच रितेश देशमुखने आपल्या चाहत्यांना एक खास आवाहन केले आहे.
रितेशने या चित्रपटाच्या लोगोसाठी आपल्या चाहत्यांना आवाहन केले होते. त्यानंतर चाहत्यांनी त्याला अभूतपूर्व प्रतिसाद देत राजा शिवाजी नावाच्या लोगोचे
तब्बल 10,000 हून अधिक मेल पाठवलेत. स्वतः अभिनेता रितेशने यासंबंधी आपल्या इंस्टाग्रामवरुन माहिती देत चाहत्यांचे आभारही मानलेत. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आम्ही चित्रपट साकारतोय-'राजा शिवाजी, या चित्रपटाचे लोगो डिज़ाइन करण्यासाठी आम्ही आवाहन केले होते. जवळपास 10,000 हून जास्त e-मेल्स आले. त्यातले काही डिझाईन्स मी पोस्ट करतोय. उस्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार... असं त्याने म्हटले आहे.
ट्रेंडिंग बातमी - काहीतरी मोठे घडणार ? CDS आणि NSA ची पंतप्रधानांसोबत बैठक)
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली होती. चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी साताऱ्याच्या कृष्णा नदीमध्ये एक डान्सर पडल्याचे समोर आले होते. त्यानंतर सिनेविश्वात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा शुटिंग सुरळित सुरु झाले आहे.
(ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: पाकिस्तानचा मोठा डाव फसला, करायला गेले एक अन् झालं भलतचं)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world