जाहिरात

'माझं गाणं पाहीलं अन् 'त्यांनी' अखेरचा श्वास घेतला', आला रे आला पिळगावकरांचा नवा कंटेन्ट आला

Sachin Pilgaonkar Viral Video: सचिन पिळगांवकर यांनी सांगितलेला हा किस्सा चांगलाच व्हायरल झाला आहे.

'माझं गाणं पाहीलं अन् 'त्यांनी' अखेरचा श्वास घेतला', आला रे आला पिळगावकरांचा नवा कंटेन्ट आला
मुंबई:

अभिनेते सचिन पिळगांवकर आणि वाद काही संपताना दिसत नाही. आज काल सचिन काही बोलले आणि त्यावर चर्चा झाली नाही असं नाही. सोशल मीडियावर तर सचिन काही बोलतात का याचीच वाट जणू नेटकरी पाहात असतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आता सचिन यांनी नेटकऱ्यांना या चर्चेची आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यात ते सांगतात की माझं गाणं ऐकलं आणि जेष्ठ निर्माते राजकुमार बडजात्या यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर तर सोशल मीडियावर प्रतिक्रीयांचा पाऊस पडला आहे. त्यात अनेक प्रतिक्रीया या सचिन यांची खिल्ली उडवणाऱ्या आहेत. 

नक्की वाचा: 'माझी भाषा मराठी पण मी विचार उर्दूतून करतो', पिळगावकर बोलले नेटकरी एकवटले

सचिन पिळगांवकर यांनी काय म्हटले ? (Sachin Pilgaonkar Viral Video)

सचिन पिळगांवकरांच्या या व्हिडीओत त्यांनी एक आठवण सांगितली आहे. त्यांनी म्हटले की, निर्माते राजकुमार बडजात्या हे आजारी होते. त्यांची तब्बेत खालावली होती. त्यांचा नातू त्यांच्यासोबत होता. त्यावेळी त्यांच्या नातवाने राजकुमार यांना विचारले की तुमची इच्छा काय आहे. त्यावर ते म्हणाले की, "मला सचिनचं ते शाम तेरी बनसी पुकारे राधा नाम हे गाणं पाहायचं आहे. मला सचिन पाहायचा आहे." त्यानंतर त्यांनहा हे गाणं YouTubeवर दाखवण्यात आलं.हे गाणं पाहिल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा सगळा किस्सा सचिन यांनी रंगवून सांगितला आहे. किस्सा सांगितल्यानंतर त्यांनी कसेबसे आपले अश्रू आवरल्याचेही व्हिडीओत दिसते आहे.  

त्याकाळी मोबाईल होते का ? लोकांनी विचारला प्रश्न (Comments On Sachin Pilgaonkar Viral Video)

सध्या त्यांनी सांगितलेला हा किस्सा चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाली आहे. प्रतिक्रियांचा तर पाऊस पडत आहे. बऱ्याच जणांनी सचिन यांची फिरकी घेतली आहे. एकाने म्हटलं आहे की दादासाहेब फाळके यांना सचिन पिळगांवकर पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. काही जणांना नक्की कोणाचं निधन झालं हे समजलं नाही. त्यामुळे काही जण राज कपूर, राजकुमार यांचाही प्रतिक्रियांमध्ये उल्लेख करत आहेत. या दोघांचे निधन झाले त्यावेळी मोबाईल होते का? असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे. 

नक्की वाचा: Ashi Hi Banwa Banwi Part 2: 'अशी ही बनवाबनवी पार्ट 2 येणार? वाचा सचिन पिळगांवकर काय म्हणाले

सचिन पिळगांवकर यांची उडवली खिल्ली

एक युजर्स सांगतो की एक गोष्ट लक्षात घेतली का तुम्ही? हा माणूस नेहमी अशा लोकांचा refrence देतो जे आज हयात नाहीत. त्यामुळे याला कोणी counter करणार नाही. हयात असलेल्या व्यक्तींच्या सहसा नादी लागत नाही हा लालगंधर्व. असं म्हटलं आहे. तर एक युजर्स सचिन यांच्या बचावासाठी पुढे आला आहे. तो म्हणतो ते राजकुमार बडजात्या या निर्मात्याबद्दल बोलत आहेत. ज्यांच निधन 2019 ला झालं आहे, quite possible. आणि गाणही तेवढेच सुंदर आहे, मरताना पण ऐकावं असं. सचिन पिळगांवकर यांच्या या व्हिडीओवर मिम्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

नक्की वाचा: Shah Rukh Khan Diwali: शाहरुखच्या 'मन्नत' वर नाही झाली दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com