जाहिरात

Saiyaara OTT Release Date: चित्रपटगृह गाजवल्यानंतर 'सैय्यारा' आता OTT वर; रिलीजची तारीख, वेळ एका क्लिकवर

मोहित सुरी दिग्दर्शित सैय्यारा चित्रपट 18 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पत्रकार वाणी बत्रा आणि सर्वोत्कृष्ट गायक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कृष कपूरची कहाणी आहे.

Saiyaara OTT Release Date: चित्रपटगृह गाजवल्यानंतर 'सैय्यारा' आता OTT वर; रिलीजची तारीख, वेळ एका क्लिकवर
सैयारा ओटीटी रिलीज डेट
मुंबई:

Saiyaara Movie On OTT : अनेक रेकॉर्ड मोडणारा आणि प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालणारा चित्रपट 'सैय्यारा' लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी सैय्यारा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. या चित्रपटात त्यांना उत्तम अभियन केल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी सैय्याराने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली. चित्रपटगृहातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकजण तर चित्रपटगृहात ओक्साबोक्शी रडत होते. ज्यांना चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही ते  ओटीटीवर प्रतीक्षा करीत आहेत. दरम्यान आमच्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.  

Saiyaara OTT Release Date

अद्याप तरी याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र व्हायआरएफचे कास्टिंग दिग्दर्शक शानू शर्मा यांनी आपल्या सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितल्यानुसार हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ओटीटीफ्लिक्सच्या एका अहवालानुसार, सैय्यारा १२ सप्टेंबर, २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. कास्टिंग दिग्दर्शक शानू शर्मा यांनी ही माहिती आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. 

शाहरुख खानच्या 'जवान'वर अहान पांडेचा 'सैय्यारा' पडला भारी, IMDb रेटिंग पाहून हैराण व्हाल!

नक्की वाचा - शाहरुख खानच्या 'जवान'वर अहान पांडेचा 'सैय्यारा' पडला भारी, IMDb रेटिंग पाहून हैराण व्हाल!

सैय्याराबाबत अधिक माहिती...

मोहित सुरी दिग्दर्शित सैय्यारा चित्रपट 18 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पत्रकार वाणी बत्रा आणि सर्वोत्कृष्ट गायक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कृष कपूरची कहाणी आहे. दोघांचा स्वप्न त्यांना एकत्र आणतं. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र पुढे प्रेम मिळवणं इतकं सोपं नसतं. अशी या चित्रपटाची पटकथा आहे. या चित्रपटाने अहान पांडेला YRF चा हिरो म्हणूनही लाँच केलं. 'बिग गर्ल्स डोन्ट क्राय' या बहुप्रतिक्षित मालिकेतील उत्कृष्ट कामाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अनित पड्डा हिला स्टुडिओने पुढील YRF हिरोइन म्हणून निवडलं आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com