गोळीबाराच्या वेळेस सलमान खान घरातच होता, लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय

Salman Khan: पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेर असलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. गोळीबार करणाऱ्या आरोपींची उंची पाहता ते महाराष्ट्रातील नसून राजस्थान किंवा हरियाणातील असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Salman Khan: सलमानच्या घराबाहेरील भिंतीवर आढळल्या गोळीबाराच्या खुणा

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीस केवळ हवेमध्ये गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात होते. पण तपासादरम्यान सलमानच्या (Salman Khan) घरावर निशाणा साधून गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. फॉरेन्सिक टीमला अभिनेत्याच्या घराबाहेरील भिंत आणि बाल्कनीवरही गोळीबाराच्या खुणा आढळल्या आहेत. ज्या बाल्कनीतून चाहत्यांना सलमान खानची झलक पाहायला मिळते, त्याच दिशेने गोळीबार करण्यात आला आहे. पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने चेहरा झाकलेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यामुळे पोलीस आता परिसरातील अन्य सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. 

गोळीबार करणारे बिश्नोई टोळीचे असल्याचा संशय 

सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार करणारे दोन आरोपी बाईकवरून आले होते. या दोघांनीही हेल्मेट घातले होते. यामुळे आरोपींची ओळख पटवण्यामध्ये पोलिसांसमोर अडचणी निर्माण होत आहेत.  

गोळीबारादरम्यान घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या चार वॉचमनचे जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवले आहेत. रिपोर्ट्सनुसार, 7.6 Bore बंदुकीतून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच गोळीबार करणारे दोन संशयित हे लॉरेन्स बिश्नोई टोळीतील असावेत, असाही संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement

घटनास्थळी सापडले लाइव्ह बुलेट

याशिवाय पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, दोन्ही आरोपींची उंची 5 फूट 8 इंच इतकी असू शकते. आरोपींची उंची पाहता दोन्ही आरोपी महाराष्ट्र राज्यातील नसून राजस्थान किंवा हरियाणातील असावेत, असाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर ताब्यात घेतले आहेत. फॉरेन्सिक टीमच्या म्हणण्यानुसार, एकूण पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. घटनास्थळी एक लाइव्ह बुलेटही सापडले, बंदुक लॉक करताना हे बुलेट खाली पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आणखी वाचा

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, पोलिसांनी वाढवली सुरक्षा

सलमान खानने चाहत्यांना दिली गुडन्यूज, सुलतान-टायगरनंतर भाईजान दिसणार या भूमिकेत

अक्षय कुमारच्या नावावर फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी घातल्या बेड्या

Topics mentioned in this article